Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *शेतमजूर ''टेकाम'' कुटुंबियांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*शेतमजूर ''टेकाम'' कुटुंबियांना २० लाखाचे आर्थिक सहाय्य्य करा - भूषण फुसे* *सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी घेतली मृत शेतमजुराचा कुटुंबीयांची भेट* *लखमापूर येथील शेतमजूराचा रोटावेटर मध्ये अडकून झाला होता मृत्यू*

*शेतमजूर ''टेकाम'' कुटुंबियांना २० लाखाचे आर्थिक सहाय्य्य करा - भूषण फुसे*    *सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी घेतली मृत शेतमजुराचा कुटुंबीयांची भेट*    *लखमापूर येथील शेतमजूराचा रोटावेटर मध्ये अडकून झाला होता मृत्यू*

*शेतमजूर ''टेकाम'' कुटुंबियांना २० लाखाचे आर्थिक सहाय्य्य करा - भूषण फुसे*

 

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी घेतली मृत शेतमजुराचा कुटुंबीयांची भेट*

 

*लखमापूर येथील शेतमजूराचा रोटावेटर मध्ये अडकून झाला होता मृत्यू*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदूर:-ट्रॅक्टरला लावलेल्या रोटावेटर मध्ये अडकून मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दि. १६ ऑकटोबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे घडली होती. रमेश शामराव टेकाम वय ४७ वर्षे असे मृत शेतमजुरांचे नाव आहे. रब्बी शेतीचा हंगाम सुरु झाल्याने ट्रॅक्टर मालक रवींद्र गोपाळ वडस्कर यांनी आपल्या गोठ्यातून ट्रॅक्टर बाहेर काढले. यावेळी त्यांच्याकडे कामावर असलेले शेतमजूर रमेश टेकाम यांना रोटावेटर मध्ये अडकलेली माती साफ करण्यास सांगितले. दरम्यान माती साफ करीत असताना ट्रॅक्टर सुरु केल्याने त्यामध्ये अडकून रमेश टेकाम यांच्या शरीराचे तुकडे झाले व त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता.

दि. १८ ऑकटोबर ला सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी मृतक शेतमजूर रमेश टेकाम यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले व झालेला प्रकाराबद्दल माहिती घेतली. टेकाम कुटुंबीयांनी सांगितले कि त्यांची मागणी वीस लाखाची असताना फक्त एक लाख देण्यात आले व अजून दीड लाख देतो असे सांगण्यात आले. टेकाम कुटुंबीयांची मागणी वीस लाखाची असताना पोलिसांनी मजूराने आपला जीव निष्काळजीपणा गमावला असे कुटुंबियांना सांगितले. भूषण फुसे यांनी पोलिसांच्या या कृत्याचे निषेध नोंदवत मजुराला न्याय मिळवून देत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत टेकाम कुटुंबीयांना वीस लाखाची मदत मिळालीच पाहिजे असे सांगितले. याबाबत पोलिसांना व कुटुंबियांचे म्हणण्याची चित्रफीत सोशलमिडीयावर प्रसारित करण्यात आली असून जो पर्यंत टेकाम कुटुंबीयांना वीस लाखाची मदत मिळत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

कोरपनातील बातम्या

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

*राजुरा विधानसभा क्षेत्रात हजारो बोगस मतदार : भुषण फुसे यांनी पाठविले निवडणूक आयोगाला निवेदन*

*राजुरा विधानसभा क्षेत्रात हजारो बोगस मतदार : भुषण फुसे यांनी पाठविले निवडणूक आयोगाला निवेदन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...