Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आनलाईन मतदार नोंदणीत...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आनलाईन मतदार नोंदणीत मोठा घोळ* *संशयास्पद ऑनलाईन अर्जाची तपासणी करून कार्यवाही करण्याची काँग्रेसची मागणी*

*आनलाईन मतदार नोंदणीत मोठा घोळ*    *संशयास्पद ऑनलाईन अर्जाची तपासणी करून कार्यवाही करण्याची काँग्रेसची मागणी*

*आनलाईन मतदार नोंदणीत मोठा घोळ*

 

*संशयास्पद ऑनलाईन अर्जाची तपासणी करून कार्यवाही करण्याची काँग्रेसची मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-- राजुरा-७० विधानसभा मतदार संघात नविन मतदार नोंदणी करिता ERO Net ऑनलाइन पोर्टलवर नमूना अर्ज क्र. ६ हजारोंच्या संख्येने नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास येत असून सदर नोंदण्या दिनांक ०१/१०/२०२४ पासून करण्यात आले आहे असे दिसून येते. सदर नोंदण्या हजारोंच्या संख्येने होत असून सद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फायदा घेण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक करण्यात येत आहे असे दिसून येते.त्यामुळे दिनांक ०१/१०/२०२४ पासून आजपर्यंत सदर ऑनलइन पोर्टल वर नविन मतदार नोंदणी करीता किती नमूना अर्ज क्र. ६ चे अर्ज प्राप्त झालेले आहे. सदर अर्जावर आपल्या मार्फत काय कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदर अर्ज वैद्य आहेत की अवैद्य याबाबत मूल्यमापन झालेले आहे की नाही. हि संपुर्ण विस्तृत माहिती राजुरा-७० विधानसभा मतदार संघातील तालुका निहाय पुरविण्यात यावी. व अवघ्या १५ दिवसांत हजारोंच्या संख्येने ऑनलइन पोर्टलवर नविन मतदार नोंदणी करण्याकरिता अर्ज प्राप्त होणे संशयास्पद असून सदर नोंदणी कुठल्या संगणकाच्या IP Adress वरून अर्ज ऑनलाईन पोर्टलवर टाकण्यात येत आहे याची सखोल चौकशी करून बोगस नोंदणी करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. व ऑनलाइन पोर्टलवर झालेली बोगस मतदार नोंदणी वगळण्यात यावी अशी मागणी राजुरा काँग्रेसच्या वतीने मुख्य निवडणुक आयुक्त भारत निवडणूक आयोग, आयुक्त, महाराष्ट्र निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी,  जिल्हाधिकारी विनय गौडा, राजुरा विधानसभा ७० निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

कोट:अमेरिका राय नावाची व्यक्ती नांदा येथे राहत नाही, असे नाव कधी इथल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी ऐकलेले नाही. असे असताना असी नावे या गावाच्या मतदार यादीत कशी आलीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशाच पद्धतीने राजुरा - ७० मतदार संघातील मतदार यादीत अनेक नावे घुसवून निवडणूकीत निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे का?, यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारांची अधिक सखोल चौकशी करून सर्व बोगस नावे तातडीने कमी करावी अन्यथा याविरोधात तिव आंदोलन छेडण्याचा इशारा राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

राजुरातील बातम्या

*क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौक सौंदर्यीकरणाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन*

*क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौक सौंदर्यीकरणाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते मोफत सी टी स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण : अत्याधुनिक सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते मोफत सी टी स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण : अत्याधुनिक सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा...

*जामणी येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण*

*जामणी येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...