Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *''असे लाभेल आम्हास, आतापर्यंत...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*''असे लाभेल आम्हास, आतापर्यंत जनप्रतिनिधी'' - गावकरी म्हणे* *कोरपना तालुक्यातील अंतरंगाव येथील नागरिकांनी मांडल्या व्यथा* *सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी ठेवले कपाळावर हाथ*

*''असे लाभेल आम्हास, आतापर्यंत जनप्रतिनिधी'' - गावकरी म्हणे*    *कोरपना तालुक्यातील अंतरंगाव येथील नागरिकांनी मांडल्या व्यथा*    *सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी ठेवले कपाळावर हाथ*

*''असे लाभेल आम्हास, आतापर्यंत जनप्रतिनिधी'' - गावकरी म्हणे*

 

*कोरपना तालुक्यातील अंतरंगाव येथील नागरिकांनी मांडल्या व्यथा*

 

सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी ठेवले कपाळावर हाथ

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना :-दि. १४ ऑकटोबर २०२४ राजुरा विधानसभा क्षेत्रात सिमेंट, कोळसा उद्योगामुळे खनिज निधी उपलब्ध होतो. वास्तविक पाहता या खनिज निधीतून सर्वात अगोदर कोणते काम व्हायला पाहिजे होते तर ते होते शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्याकरिता पांदण रस्त्याचे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता अवदशा, येईल देशा।। ग्रामगीतेच्या ह्या म्हणी प्रमाणे कार्य झाले असते तर जगाचा पोशिंदा परिसरातील शेतकरी हा सुखी झाला असता. सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे हे कोरपना तालुक्यातील अंतरंगाव येथे आले असता पांदण रस्त्याचा समस्येबद्दल गावकरी व शेतकऱ्यांनी व्यथा मांडली तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरीत एका शेतकऱ्याने म्हटले ''असे लाभेल आम्हास आतापर्यंत जनप्रतिनिधी, येता निवडणुकीच्या वेळेस दारी'' हे एकूण सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी कपाळावर हाथ ठेवले. नंतर भूषण फुसे यांनी ''ह्या वेळेस प्रस्थापितांना धडा शिकवावा मज सारख्या नव्या तरुण तडफदार उमेदवारांना निवडून द्यावा'' म्हणताच गावकऱ्यांना हसू आवरेनासे झाले.गाव हा देशाचा चेहरा असतो, राज्यघटनेनेही ग्राम पंचायतीला विशेष महत्व दिले आहे. कोरपना तालुक्यातील अंतरंगाव येथील नागरिकांनी भूषण फुसे याना शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्याची माहिती दिली. पावसाळ्यात या पांदण रस्त्याने जाणे येणे कठीण झाले असून शेकडो शेतकरी दररोज या त्रासदायक पांदण रस्त्याने जाणेयेणे करावे लागत आहे. २०२३ च्या पुरबुडीच्या वेळेसचे अनुदानाची रक्कमही देण्यात आली नसून तारीख पार तारीख मिळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. गावकऱ्यांनी सांगितले कि, गावालगत असलेल्या वेकोलि खाणीच्या नियोजनशून्य भोंगळ कारभारामुळे नदीचा प्रवाह गावाकडे वळल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात संपूर्ण गाव बुडून जात आहे. गावाला एकच मुख्य रस्त्या आहे आणि तो रस्ता ही पावसाळ्यात पाण्याखाली बुडाल्याने गावकऱ्यांचा तालुक्याशी व इतर गावांशी संपर्क तुटतो. गावकऱ्यांची अशी मागणी आहे की त्यांना पर्यायी रस्ता करून द्यावे जेणेकरून पावसाळ्यात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच गावातील समस्यांचे कथन केले. यावेळी शेकडो गावकरी व महिला उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

कोरपनातील बातम्या

*कवडु गाताडे यांची दैनिक विश्व जगत* *जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर म्हणून नेमणूक*

*कवडु गाताडे यांची दैनिक विश्व जगत जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर म्हणून नेमणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...