Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते मोफत सी टी स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण : अत्याधुनिक सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते मोफत सी टी स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण : अत्याधुनिक सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते मोफत सी टी स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण : अत्याधुनिक सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-- राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी या आदिवासी बहुल, दुर्गम भागातील गोरगरीब जनतेला सी. टी. स्कॅन साठी खाजगी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात पैसे मोजावे लागत होते त्यामुळे अनेक आर्थिक अडचणींमुळे सी. टी स्कॅन करू शकत नव्हते व आजाराचे निदान होऊ शकत नव्हते ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे २ कोटी ५० लक्ष रुपये निधीच्या मोफत सी. टी. स्कॅन तपासणी केंद्राची मंजुरी मिळवून घेतली. या मोफत सी. टी. स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले यावेळी मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, २०१३ मध्ये उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे ९८ आर जागेचा सातबारा मंजूर करून येथे १०० खटाचे श्रेणी वर्धित रुग्णालय मंजुर केले आणि १३ मार्च २०२३ ला लोकार्पण केले. नवीन इमारत बांधकामासाठी ७ कोटी रु. निधी उपलब्ध करून दिला. १ कोटी ३५ लक्ष रुपये निधीचे नवीन शवविच्छेदनगृह उभारले. नव्याने ७० पदे मंजूर करून त्यातील २० पदे नियमित तर ५० पदे कंत्राटी पद्धतीने भरलेली आहेत. कोरोना काळात १ कोटी रु निधीच्या ऑक्सिजन प्लांटची मंजुरी मिळविली. प्रशस्त माडुलर ऑपरेशन थेटर, अद्यावत एक्स रे सुविधा, सोनोग्राफी सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच गंभीर रूग्णांसाठी ५ बेडची डायलिसिस सुविधा महिन्याभरात कार्यान्वित होणार आहे. आणि आता २ कोटी ५० लक्ष रुपये निधीचे मोफत सिटीस्कॅन तपासणी केंद्र या अंतर्गत ओपीडी आणि आयपीडी रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्याचे माझे ध्येय असून यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत राहणार असल्याची ग्वाही आमदार सुभाष घोटे यांनी दिली.यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, डॉ. परिमल सावंत, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक जाधव, डॉ. कपिल देशमुख, डॉ. निर्मल संचेती, डॉ. किशोर गीते, डॉ. प्रणय पंत, अशोकराव देशपांडे, दिनकर कर्नेवार, सभापती विकास देवाळकर, अफसर शेख, रुग्णालय समीती सदस्य अशोक राव, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संदीप जैन, माजी नगरसेवक आनंद दासरी, विलास तुमाने, डॉ. उमाकांत धोटे, पंढरी चन्ने, कोमल फुसाटे, धनराज चिंचोलकर, वामन वाटेकर, भाष्कर चौधरी, पूनम गिरसावळे, सय्यद साबिर, प्रणय लांडे, सी. टी. स्कॅन टेक्निशियन खुशबू भोयर, चेतन नागोसे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. परिमल सावंत  यांनी केले. संचालन पॅथॉलॉजी टेक्निशियन निवलकर यांनी तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक जाधव यांनी केले. कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

राजुरातील बातम्या

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात*

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...