Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *वन विभागा विरोधात एक...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*वन विभागा विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन* *रानडुक्कर, नीलगाय व वन्यप्राणी करत आहे पिकांचे नुकसान* *सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकवटले*

*वन विभागा विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन*  *रानडुक्कर, नीलगाय व वन्यप्राणी करत आहे पिकांचे नुकसान*  *सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकवटले*

*वन विभागा विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन*

*रानडुक्कर, नीलगाय व वन्यप्राणी करत आहे पिकांचे नुकसान*

सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकवटले

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-दि. ११ ऑकटोबर २०२४) -रानडुक्कर, नीलगाय अश्या वन्य प्राण्यांच्या हैदौसामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहे. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस करीत असूनही  शेतकरी जाचक कायद्यामुळे त्यांच्या बंदोबस्त करू शकत नाही हि वस्तुस्थिती आहे.  मानव जातीप्रमाणे इतरही पशु पक्षांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा तयार केला तो प्रत्यक्षात अमलातही आणला या कायद्यामुळे जंगलातील प्रत्येक जीवाला संरक्षण मिळाले आहे मात्र हा कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित झाले आहेत, या कायद्यामुळे शेत शिवारात शेतकऱ्यांना जाणे कठीण झाले आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार डोळ्या समोर होत असूनही वन्यप्राणी कायद्यामुळे वन्य प्राण्यांना शेतकरी इजा सुद्धा करू शकत नाही. त्याचा साधा अटकाव सुद्धा करू शकत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी केले ते तहसील कार्यालयासमोरील वन परिक्षेत्र अधिकाराच्या कार्यालयासमोर वन विभागा विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलनात बोलत होते. परिसरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते.

 

सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे पुढे म्हणाले, पेरणी पासून तर पीक हातात येई पर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवस रात्र पिकांचे संरक्षण करून पिकांचे संवर्धन करतात. यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतात, महागडे बियाणे विकत घेऊन पेरणी करावी लागते, महागडे औषधे घेऊन फवारणी करावी लागते, निंदण, डवरणी करावी लागते, प्रचंड परिश्रम घेऊन पिके घेतली जातात. मात्र शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला रोखण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे दरवर्षी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीच्या कितीही बंदोबस्त केला तरीही उपद्रवी वन्यप्राणी रानडुकरांचा कळप शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत आहे. प्रशासकीय व्यवस्था अशी आहे कि शासन प्रशासनाला तसेच वन विभागाला शेतकरी मेला तरी चालेल मात्र त्यांचा लाडका रानडुक्कर जगला पाहिजे अशी व्यवस्था बनवून ठेवली आहे. शासन प्रशासनाचा या जाचक कायद्याला बदलण्यासाठी हिवाळी अधिवेशनात जिवती ते नागपूर बैलबंडी मोर्चाही काढण्यात आला होता. जमिनीचे पट्टे असो, रानडुक्करांचा प्रश्न असो, सिंचनाचा प्रश्न असो वा बोगस बी बियाणे असो आम्ही सातत्याने शेतकऱ्यांच्या या गंभीर विषयाकडे गंभीरतेने बघतोय वेळ पडल्यास शासन प्रशासनाला तसेच वन विभागा विरोधात आक्रमक आंदोलन उभारावे लागेल तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही असे हि फुसे म्हणाले. आंदोलनानंतर वन विभागाला वन्यप्राणाच्या हैदोसावर आळा घाला या मागणीचे निवेदनही देण्यात आले. आंदोलनात प्रामुख्याने रामदास धानोरकर, सुशील मडावी, भास्कर वांढरे, नारायण भंडारे, सुभाष हजारे, दीपक मडावी व परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

राजुरातील बातम्या

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात*

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...