Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *सामाजिक कार्यकर्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी:-दि. ११ ऑकटोबर २०२४ जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तस-तसे राजकीय वातावरण तापत असून आपआपल्या नेत्यांचे कार्यकर्ते व्हाट्सएप ग्रुपमध्ये एकमेंकांवर आरोप प्रत्यारोपाचे वातावरण निर्माण करत आहे. भाजप, काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या या प्रस्थापितांच्या गर्दीत सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे हे मागील काही वर्षांपासून सामाजिक कार्यातून जनतेचे सेवक बनले असून शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला व विद्यार्थी वर्गात भूषण फुसे लोकप्रिय होत आहे. त्यांच्या या लोकप्रियतेने काही लोकांच्या पोटात दुखत असल्याने राजकीय सूड एके दिवशी कोणी न कोणी उगारणार हे त्यांनाही  ठाऊकच होते.आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान गोंडपिपरी परिसरात एका अरुंद मार्गावर एका इसमाने मोठ्या दगडाने त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना उजेडात आली आहे. एक इसम मोठा दगड घेऊन फुसे यांच्या गाडीचे काच फोडत असून दुसरा इसम गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तिथे उपस्थित काही लोक व महिला बघ्यांच्या भूमिकेत असल्याचे ह्या व्हिडिओत दिसून येत असून सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्यावर व त्यांच्या गाडीवर हल्ला करणारे कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे? ह्या प्राणघातक हल्यात भूषण फुसे यांना जिवे मारण्याच्या हेतूने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांचा मोठा दगड फूसे यांच्या हाताला बसला असून त्यांचे हाथ रक्त बांबड झाले आहे. त्यांच्या हाताला व पायाला जबर दुखापत झाली असून याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

येणारी विधानसभा निवडणूक रक्तरंजित होणार का?

एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने भूषण फुसे यांनी सर्वसाधारण लोकांचे कामे न करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रति कठोर पावले उचलली आहे. त्यामुळे सर्वसाधारण लोकांत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. भूषण फुसे यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे ते कमी वेळात सर्वसाधारण लोकांत लोकप्रिय झाले असून विरोधकही त्यांच्या डाव करण्याचा बेतात असल्याचे त्यांचा कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. भूषण फुसे हे त्यांच्या प्रभावी भाषणाने येथील प्रस्थापित भाजप, काँग्रेस व शेतकरी संघटनेवर आसूड टीका करत असून या पार्टीतील लोकांच्या डोळ्यात तर ते खुपसत नाही आहे ना हा प्रश्न निर्माण झाला आहे. भूषण फुसे याना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी होत असून दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार फुसे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा शासकीय कर्मचारी असून व्हेटर्नरी डाक्टर आहे. हल्लेखोरांचे नाव तेलकापल्लीवार असून आक्सापूर येथे नोकरीवर आहे. शासकीय कर्मचारीच सामाजिक कार्यकर्त्यांवर असे प्राणघातक हल्ले चढवीत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसाधारण लोकांचे काम न करणाऱ्या, सामान्य लोकांना कार्यालयात चपला घासायला लावणाऱ्या सरकारी नोकरीचा माज आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्याड हल्ल्याला आम्ही घाबरणारे नसून सर्वसाधारण लोकांना वेठीस धरणाऱ्यांना आम्ही त्यांच्याच भाषेत कारवाई करण्यात सज्ज आहोत असा सज्जड इशारा हि भूषण फुसे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...