Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली तालुक्यात १७...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन* *विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत रस्ते, सामजिक सभागृहांचा समावेश*

*सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन*    *विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत रस्ते, सामजिक सभागृहांचा समावेश*

*सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन*

 

*विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत रस्ते, सामजिक सभागृहांचा समावेश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीकोन, जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्याची धडपड, आणि विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून ब्रह्मपुरी मतदार संघात आजवर कोट्यावधींची विकास कामे मंजूर झाली व ती पूर्णत्वासही आली आहे. तर क्षेत्रातील उर्वरित रखडलेल्या रस्त्यांच्या नवनिर्माणासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नाने अर्थसंकल्प २०२३-२४ व २५१५ लेखाशिर्ष अंतर्गत १७.४५ कोटींच्या विकास निधीस मंजुरी मिळाली असून आज युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते सदर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.एक जागरूक व जनहितकारी कार्यासाठी कटीबद्ध असलेले कणखर नेतृत्व म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे होय. त्यांच्या कारकीर्दीत संपूर्ण ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ना भूतो न भविष्यती असा विकास साधला गेला असून आजही त्यांच्या विकास कामांचा झंजावात जोमाने सुरू आहे. नुकताच त्यांनी शासन स्तरावर सततचा पाठपुरवठा करून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यांत  अर्थसंकल्प २०२३-२४ व  २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत १७.४५ कोटींचा विकास निधी मंजूर करून घेतला. यात सावली तालुक्यातील हिरापुर - बॉथली - पेंढरी - पाथरी प्रजिमा २७ रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करणे (अंदाजित किंमत ९ कोटी), कापसी - व्याहाड (बुज) ते मुल - गडचिरोली प्रजिमा - २८ रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करणे (अंदाजित किंमत ५ कोटी ), मौजा सामदा येथे बौद्ध समाज सभागृह बांधकाम करणे (२० लक्ष), वाल्मिकी समाज सभागृह (२५ लक्ष), सामदा (बुज) ते सोनापुर - भांसी रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करणे (अंदाजित किंमत ३ कोटी रुपये) अशा एकूण १७.४५ कोटींच्या विकास कामांचा समावेश आहे.यावेळी मार्गदर्शनपर बोलताना युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दूर दृष्टिकोण आणि जनते प्रति असलेली तळमळ यामुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या मूलभूत गरजांसह, सुसज्ज प्रवास मार्ग, सामाजिक उपक्रमाकरिता सभागृह, शेती सिंचनाकरिता बंधारे, गोसेखुर्द अंतर्गत कालव्यातून पाणीपुरवठा, शुद्ध पेयजल, क्रीडापटूंसाठी क्रीडा संकुल, युवकांसाठी व्यायामशाळा तसेच शिक्षणार्थी विद्यार्थ्यांकरीता ई - लायब्ररी ,वाचनालय, यासह अनेक अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील हा ऐतिहासिक विकास असून एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेला दिलेल्या वचनाची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वचनपूर्ती केल्याची यावेळी त्यांनी सांगितले.आयोजित भूमिपूजन सोहळ्यास माजी जि. प. बांधकाम सभापती दिनेश चीटनुरवार काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहने, महिला आघाडी अध्यक्ष उषा भोयर, माजी प.स.सभापती विजय कोरेवार, आशिष मनबत्तुलवार, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, यांचे सह विविध गावातील ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक  उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...