Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *पानठेला संचालकांकडून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*पानठेला संचालकांकडून दंड म्हणून हजारो रुपये वसूल करणारे कोण?* *दंड वसूल करण्याची पावती ला कार्बन कॉपी नाही?* *''डिजिटल इंडिया'' च्या जमान्यात दंडाची रक्कम नगदी स्वरूपात का?* *सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी उठवला प्रश्न*

*पानठेला संचालकांकडून दंड म्हणून हजारो रुपये वसूल करणारे कोण?*    *दंड वसूल करण्याची पावती ला कार्बन कॉपी नाही?*    *''डिजिटल इंडिया'' च्या जमान्यात दंडाची रक्कम नगदी स्वरूपात का?*    *सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी उठवला प्रश्न*

*पानठेला संचालकांकडून दंड म्हणून हजारो रुपये वसूल करणारे कोण?*

 

*दंड वसूल करण्याची पावती ला कार्बन कॉपी नाही?*

 

*''डिजिटल इंडिया'' च्या जमान्यात दंडाची रक्कम नगदी स्वरूपात का?*

 

सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी उठवला प्रश्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदूर:-दि. १० ऑकटोबर २०२४) तरुणांची धूम्रपानाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी रमेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना मागवल्या होत्या. या समितीने आपल्या अहवालात तंबाखूमुक्तीसाठी कठोर शिफारशी केल्या. आरोग्य मंत्रालयाने या शिफारशी तत्त्वत: स्वीकारल्या. तंबाखूसेवनामुळे होणारे आजार आणि आरोग्याशी संबंधित अन्य समस्यांमुळे होणारे नुकसान थांबवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.गडचांदूर परिसरात चार व्यक्ती पानठेल्यावर जाऊन पाचशे, हजार रुपयाचा दंड स्वरूपाच्या पावत्या फाडत असल्याची माहिती येथील एका पानठेला संचालकाने सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांना दिली. भूषण फुसे यांनी या चौघांना थांबवून चौकशी केली असता त्या चौघांनी आपले ओळखपत्र दाखविले. यात एक व्यक्ती डेन्सटिस्ट आहे, नर्सिंग कॉलेज चा विद्यार्थी आहे. त्याचा सोबतीला पुन्हा दोघे जण हे पानठेल्यावर जाऊन दंड स्वरूपात पावती फाडत असल्याचे सांगितले. फुसे यांनी पावती बुक बघितली असता पावती बुकाला कार्बन कॉपीच नसल्याचे आढळले, पावती वर चक्क मगाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन कायदा २००३ असे नमूद असून खाली दंड वसूल करणाऱ्याची सही आणि तंबाखू नियंत्रण अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर असे नमूद आहे. पावती क्रमांक १०९५ वर १००० एक हजार रुपयाचे दंड वसूल केल्याचे नमूद असून पावतीला कार्बन कॉपी नसल्याने असले दंड वसूल करणारे भामटे तर नाही ना असा खडा सवाल फुसे यांनी उपस्थित केला आहे. ह्यांनी पावती देऊन एका सध्या पॅड वर त्यांची नावे नोंदवून दंडाची रक्कम लिहिली होती.एकीकडे देश डिजिटल झाल्याचा पोमाडेंग्या शासन प्रशासन करीत आहे. शासनाला दंड म्हणून रक्कम वसूल करायची असेल तर रीतसर चालान बनवून ट्रेजरीत त्याला दंडाची रक्कम भरायला सांगा. हे असले पावती देऊन जागेवर नगदी वसुली करत बिना कार्बनकॉपी वाली पावती देऊन भ्रष्ट्राचाराला खतपाणी घालण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. कोणत्याही पानठेल्या संचालकाने असल्या लोकांना दंडाची रक्कम देऊन नये, त्याने आयकार्ड दाखविले तरी सुद्धा देऊ नये, दंडाची रक्कम भरायची असेल तर आम्ही ट्रेजरीतच भरू असा आग्रह धरावा असे आवाहन 

 

सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी केले आहे. याबाबतचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडिया वर वायरल होत असून सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

लवकरच आरोग्य व तत्सम विभागाला याबाबत विचारणा केली जाणार असून आता पर्यंत असल्या पावत्या देऊन या विभागाने किती रक्कम वसूल केली याचीही माहिती घेणार असल्याचे फुसे यांनी सांगितले. फुसे यांनी दुकानदारांना विचारणा केली असता दार दिवाळीच्या अगोदर व मार्च एंडिंग मध्ये हे असले लोक येऊन पाचशे हजार रुपये घेत जातात असे सांगितले.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

कोरपनातील बातम्या

*कवडु गाताडे यांची दैनिक विश्व जगत* *जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर म्हणून नेमणूक*

*कवडु गाताडे यांची दैनिक विश्व जगत जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर म्हणून नेमणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...