Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *सामाजिक राजकीय विषयावर...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार*

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन*    *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार*

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन*

 

*तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्हयात बहुसंख्य असलेला तेली समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सुदृढ असला तरी राजकीय पटलावर या समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे सुद्धा नाही. त्यामूळे समाजाची राजकीय प्रतिमा उंचावणे अगत्याचे झाले आहे. आता राजकीय अस्मितेच्या लढाईसाठी समाजाने सर्व शक्ति पणाला लावणे गरजेचे असल्याचा सुर रविवार 6 ऑक्टोबर ला झालेल्या समाजाच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणी सभेत उमटला.चंद्रपूर जिल्हा विदर्भ तेली समाज महासंघाची महत्त्वाची सभा समाजाच्या विवीध प्रगतीचा आलेख मांडून गेली.यावेळी विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे, केंद्रीय कार्याध्यक्ष संजय शेंडे, केंद्रीय महासचिव डॉ. नामदेवराव हटवार, केंद्रीय मार्गदर्शक माजी आमदार देवराव भांडेकर, अॅड. विजय मोगरे, पांडुरंग आंबटकर, श्री. खनके सर यांचीही उपस्थीती होती.सभेत कार्यकारिणीच्या सर्व नवनियुक्त पदधिकारी व सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आल. त्यांचा परिचय, स्वागत व अभिनंदन केल्या नंतर तेली समाजाच्या विकासासाठी पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संजय बेले यांनी केलें.पोटदुखे आणि भांडेकरां नंतर काय?तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाचा मागोवा घेताना स्व. शांताराम पोटदुखे आणि देवराव भांडेकर यांचा सन्माननीय अपवाद स्पष्ट आहे. मात्र त्यानंतर समाजाची शक्ति असूनही क्षमता असलेल्या व्यक्तीला राजकीय पाठबळ दिलें गेले नाही. उलट तेली समाजाच्या मतांचा वापर भाजप सह सर्वच पक्षांनी केला. त्यामुळे हा अन्याय दूर करण्याची ही वेळ असल्याच्या भावना अनेकांनी बोलून दाखविल्या.

डॉ. विश्वास झाडे यांना उमेदवारी मिळावी!

डॉ. विश्वास झाडे हे तेली समाजाचे वैद्यकीय भूषण असुन त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे. त्यांची प्रतिमा उच्च कोटीची आणि स्वच्छ आहे. समाजात त्यांचें कार्य आणि स्थान सन्माननीय आहे. त्यांच्या अंगी नेतृत्व क्षमता सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जावी अश्या सामाजिक भावना सुद्धा या सभेत सामुहिकरीत्या व्यक्त झाल्या.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

चंद्रपूरतील बातम्या

*श्री.साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली* *संस्थाचालकास सद्बुद्धी देण्यासाठी माता महाकालीला साकडे*

*श्री.साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली* *संस्थाचालकास सद्बुद्धी देण्यासाठी...

*अल्पवयीन मुलीवर अत्याचार.आरोपी शिक्षकाला अटक*

*अल्पवयीन मुलीवर अत्याचार.आरोपी शिक्षकाला अटक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात...

*अल्पसंख्यकांनो सावधान भाजप नंतर काँग्रेस च्या खासदार ताई पेरतंय जातीयवादीचे बियाणे - भूषण फुसे*

*अल्पसंख्यकांनो सावधान भाजप नंतर काँग्रेस च्या खासदार ताई पेरतंय जातीयवादीचे बियाणे - भूषण फुसे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...