Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *मंगेशची गळफास घेऊन...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*  

 

  ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि

जिवती:-चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातीलतेलंगाना सीमेवरील डोंगरावर असलेल्या कोदेपूर स्वःसांगळा पाटील आश्रम शाळेतील इयत्ता बारावीचा विद्यार्थी जनजातीय कोलाम समूहातील मंगेश जलपती आत्राम वय १७ वर्ष रा आंबेझरी हा पोळ्याच्या सणाला गावाला आला होता व गावावरून पोळ्यानंतर कोदेपूर येथील वस्तीगृहातच या गावातील आश्रम शाळेत चार विद्यार्थी व तीन विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे अशी माहिती मृतकाच्या वडिलांनी दिली शनिवारी सकाळी सात वाजता तो नाश्ता करिता आल्याची माहिती शिक्षकांनी दिली मात्र 11:45 वाजता तो आपल्या मित्रासोबत भोजनासाठी न येता खोलीमध्ये होता अंदाजे बारा वाजता सुमारास वस्तीगृहातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते मात्र शाळा व्यवस्थापनाने याबाबतची कोणती माहिती पोलीस प्रशासनाला दिली नाही व त्या मृतकाला स्वास्थ्य केंद्र जिवती येथे आणण्यात आले व त्यांच्या वडिलांना ही माहिती होताच मंगेशला त्या ठिकाणावरून गडचांदूर येथे उपचारासाठी म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले असता डॉक्टर आणि त्यांना मृत घोषित केले पात्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व शासन केंद्रात शासनाच्या वतीने देशभरात जनजातीय कोलाम समूहासाठी विविध योजना व विकासाचे घोषणा करत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी मध्ये दिरंगाई होत असल्याची चिंता व्यक्त केल्या जात आहे शाळेमध्ये मुख्याध्यापक  गुहपाल अधिक्षक यांचे नियंत्रण नसल्यामुळे दुर्गम डोंगरी भागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आत्महत्या सारखी घटना ही चिंतनीय बाब आहे नेमका मृत्यू कशामुळे झाला याबद्दल लोकांमध्ये शंका कुशंका असून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली असून जलपत आत्राम या परिवारातील होतकरू मुलगा दगावल्यामुळे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे शाळेमधील विद्यार्थीमध्ये दहशत निर्माण झाली असून व्यवस्थापनाने याबाबत निष्काळजी केल्याचा आरोप समाजबांधवा कडून होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी जलपती आत्राम यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व कुटुंबाला न्याय मिळेलअसा विश्वास दिला यावेळी परिसरातील सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित होते शनिवारला ग्रामीण रुग्णालय येथे आबिद अली श्रमीकएल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांनी भेट देऊन दुर्लक्ष करणाऱ्या आश्रम शाळा व्यवस्थापन व त्या ठिकाणी असलेल्या शिक्षकांची कसून चौकशी पोलीस विभाग व आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडून करण्यात यावे व जनजाती कोलाम समूहातील कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे यावेळी भाऊराव कनाके शंकर सिडाम मारुती मळावीप्रमोद आत्राम भीम बाई आत्राम इत्यादी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी तहसील कार्यालयातील  पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. 24 October, 2024

वणी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

वणी:- तहसील कार्यालय वणी येथील तालुका पुरवठा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.आज...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* 24 October, 2024

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना  उबाठा कडुन उमेदवारी जाहीर. 24 October, 2024

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना उबाठा कडुन उमेदवारी जाहीर.

वणी:- रस्सीखेच सुरु असलेल्या वणी विधानसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या उबाठा यांचे अधिकृत...

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल 24 October, 2024

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल

वणी : विदर्भ दौऱ्यावर असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वणीच्या भेटीत पक्षाचे नेते राजु उंबरकर यांना उमेदवारी जाहीर...

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर 23 October, 2024

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा...

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

जिवतीतील बातम्या

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...