Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / बल्लारपुर पोलीसांनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय रामसागर बेन्नी वय-३७ वर्षे रा. कादरीया मस्जिद चौक बल्लारपुर जि. चंद्रपुर याने पोलीस ठाणे बल्लारपुर येथे येवून मोटार सायकल चोरीची तक्रार दिल्यावरुन पोलीस ठाणे बल्लारपुर गुन्हा रजि. क्रं.९०९/२०२४ कलम-३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयातील मोटार सायकल चोरी व आरोपीचा शोध घेणे कामी दिनांक- ०४/१०/२०२४ रोजी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे माहिती मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारा आरोपी संशयीत रित्या वस्ती परिसरात फिरत आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन एक इसम संशयीतरित्या फिरत असतांना मिळुन आल्याने. त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रिन्स ऊर्फ कालु संग्राम बहुरीया वय-२० वर्षे रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपुर जि. चंद्रपुर असे सांगितले वरुन त्यास मोटार सायकल चोरी बाबत विचारपुस केली असता. त्याने मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवुन ०२ मोटार सायकल काढुण दिल्या त्यास अधिक विचारपुस केली असता. त्याने सांगितले की, मी माझा मित्र सुरेश ऊर्फ सुर्या कैलाश हरणे वय-२० वर्षे रा. श्रिराम वार्ड चल्लारपुर जि. चंद्रपुर यांचेसह मिळुन मौजा बामणी व आंबेडकर वार्ड बल्लारपुर परिसरातुन मोटार सायकल चोरी केली आहे. 

त्या मोटार सायकल मी माझा मित्र नामे- पुतीलाल ऊर्फ हनी बाबुलाल निशाद वय-३० वर्षे रा. रामनगर सास्ती झेंडा वस्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर याला विक्री केल्याचे सांगितले व त्याचेकडे घेवुन गेला असता त्यास आरोपी क्रं. १) ने मोटार सायकल दिल्याबाबत विचारपुस केली असता. त्याने मोटार सायकल घेतल्याचे सांगितले व घरासमोर उभ्या असलेल्या ०३ मोटार सायकल काढूण दिल्या. त्यानंतर आरोपी क्रं.१) अधिक विचारपुस केली असता. त्याने आणखी मोटार सायकल मी व माझा मित्र सुर्या हरणे, लवकुश ऊर्फ डु निशाद असे मिळुन पोलीस ठाणे राजुरा व पोलीस ठाणे चंद्रपुर शहर तसेच पोलीस ठाणे बल्लारपुर येथुन चोरी केलेल्या मोटार सायकल भगतसिंग वार्ड येथिल आरोपी नामे ४) तौकीर तौहिद शेख वय-२७ वर्षे व्यवसाय मोटार सायकल गैरेज रा. भगतसिंग वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यास दिल्याचे सांगुन त्याचेकडे घेवुन गेला. त्यावेळी त्याचेकडे मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले तेव्हा त्याचे मोटार सायकल गॅरेजची पाहणी केली असता पुर्ण मोटार सायकलचे स्पेअर स्पॉर्ट खोलुन दिसले. त्यातील ०३ मोटार सायकल इंजिन ची पाहणी करुन त्याबाबत विचारपुस केली असता त्याने चोरीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यास आणखी विचारपुस केली असता त्यांने काही इंजिन भंगार दुकानदार नामे जावेद यास विक्री केल्याचे सांगितल्याने त्यास भंगार दुकान येथे आणुन भंगार दुकानाची पाहणी केली असता भंगार दुकानात ०४ मोटार सायकल इंजिन संशयीतरित्या मिळुन आल्या, याबाबत भंगार दुकानदार जावेद यास विचारपुस केली असता त्याने उडवा-उडवीचे असमाधानकारक उत्तर दिल्याने सदर मोटार सायकल ताब्यात

घेवुन त्याची शहानिशा करून पुढील कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे. सदर मोटार सायकलचे वर्णन खालील प्रमाणे-

 

१) आरोपी नामे प्रिन्स ऊर्फ कालु संग्राम बहुरीया रा. सरदार पटेल वार्ड चल्लारपुर याचे ताब्यातुन जप्त केलेल्या मोटार सायकल-

 

१) कि.अं.२०,०००/- एक काळया रंगाची हिरो कंपनीची फॅशन प्लॅस मोटार सायकल क्र.एम.एच.३४ झेड ११४० कि.अं.

 

२) रु.३०,०००/- एक काळी बजाज प्लसर मोटार सायकल क्र.MH34 AS5237.

 

१) आरोपी नामे पुतीलाल ऊर्फ हनी बाबुलाल निशाद रा. रामनगर सास्ती ता. राजुरा याचे ताब्यातून जप्त केलेल्या मोटार सायकल-

 

1) Ks.15,000/- एक काळ्या रंगाची डायमंड कंपनी स्लेंडर मोटरसायकल क्र. MH 34 BJ 5937 Ks.

 

२) कि.अं. १०,०००/- एक काळया रंगाची हिरो कंपनीची स्लेंडर मोटार सायकल क्र.एम.एच.३४ झेड.३१२८ कि.अं.

 

3) के.ए. 15,000/- हिरो होंडा क्रमांक MH34 AJ 5751 किमी ची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल.

 

१) आरोपी नामे- तौकीर तौहीद शेख वय-२७ बर्षे रा. भगतसिंग वार्ड बल्लारपु याचे ताब्यातून जप्त

 

केलेल्या मोटार सायकल-

१) याचेकडुन मोटार सायकलचे सुटे भाग एकुण-०३ इंजीन जप्त करण्यात आले असुन त्यामधील ०२ इंजिन पोलीस ठाणे बल्लारपुर येथील गुन्हयातील आहेत व ०१- पोलीस ठाणे राजुरा येथील आहे..

 

२) भंगार दुकानदार नामे जावेद वय वर्षे रा. गणपती वार्ड बल्लारपुर याचे ताब्यात्न जप्त केलेल्या मोटार सायकल-

 

१) याचेकडुन मोटार सायकलचे बजाज कंपनीचे सुटे भाग एकुण-०४ इंजीन जप्त करण्यात आले असुन त्याची शहानिशा करणे सुरु आहे.

 

असा कि.अं.९०,०००/-रु. मोटार सायकल व सुटे स्पॉर्ट व इंजिन असा एकुण-१,५०,०००/-रु मिळून आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि.सुनिल वि.गाडे, सपोनि. अंबादास टोपले, पोउपनि. हुसेन शहा, सफौ. गजानन डोईफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा, सत्यवान कोटनाके, पोहवा. सुनिल कामटकर, पोहया. पुरुषोत्तम चिकाटे, पोहया. संतोष दंडेवार, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं. अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...