Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *जिवती तालुक्यात आश्रम...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*

 

*दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

जिवती:-जिवती तालुक्यातील स्व. सांगाडा पाटील माध्यमिक आश्रम शाळेमध्ये वर्ग 12 वी मध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन संशयास्पद मृत्य झाल्याची घटना घडली आहे. कोदेपुर येथील सांगाडा पाटील माध्यमिक आश्रम शाळेमध्ये जिवती तालुक्यासह परिसरातील विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत असतात, परंतु आज एका निरपराध विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने तालुक्यात संस्थाचालकाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सदर शाळेच्या वसतिगृहाचे अधीक्षक दोन दिवसांपासून रजेवर गेले आहे, परंतु आपला चार्ज संबधित अधिकाऱ्याकडे न सोपवता त्यांनी मनमर्जीने रजेवर गेल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला.सदर घटनेची सखोल तात्काळ चौकशी करून शाळेच्या संस्थाचालकांवर तसेच मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या अधिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी 

 

सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत व्यवस्थित व्यवहार केला जात नाही. विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.  एकीकडे अश्या शाळेंना विद्यार्थी मिळणे कठीण झाले असून आता अश्या घटनेने पुन्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी व्यक्त केले आहे. फुसे यांनी शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. 27 January, 2025

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत 27 January, 2025

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत

वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा. 27 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी. 25 January, 2025

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी.

वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...

वणी शहरातील  हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट. 25 January, 2025

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जिवतीतील बातम्या

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...