Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अनुभवी आणि विकासशील...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*

 

*कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-- कोरपना तालुका काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर १३ लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार मा. श्रीमती प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर म्हणाल्या की, मला आपल्या परिसरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच मी प्रचंड बहुमताने निवडून आले. आपल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. अर्थातच माझ्या अभूतपूर्व विजयात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. ते खंबीर माझ्या पाठीशी उभे राहिल्यामुळेच मला हे यश मिळाले त्यामुळे अशा अनुभवी, विकासशील, स्पष्टवक्त्या आणि आपल्या क्षेत्रातील जनतेच्या हितासाठी कायम संघर्ष करणाऱ्या झुंजार नेतृत्वाच्या सोबत आपण सर्वांनी तितक्याच ताकदीने उभे राहून पून्हा संधी देत त्यांना प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवू या असे आवाहन केले. तर आ. सुभाष धोटे यांनी बाळूभाऊ धानोरकर यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि खा. श्रीमती प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यशैलीचा, परिश्रमाचा आवर्जून उल्लेख करीत त्या आणि आपण सदैव जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.यावेळी कोरपना तालुक्यातील विविध गावातील भारतीय जनता पक्ष, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. खा. प्रतिभाताई धानोरकर आणि आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन सर्वांचे स्वागत केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जेवरा भाजपचे जिवदास आत्राम, मांडवा शेतकरी संघटनेचे सेवा सह. सोसायटीचे संचालक तुकाराम आत्राम, विमलताई आत्राम, विठ्ठल कुमरे, कवठाळा भाजपचे शांताराम मडावी, लोणी भाजपचे ग्रा प. सदस्य कुणाल कुडमेथे, शंकर मामीडवार, गणेश काकळे, शेरज शे. संघटनेचे मोहन उराडे, अंतरगाव भाजपचे नामदेव कुमरे, नानाजी उलमाले, शे. संघटनेचे देविदास माणुसमारे, पालगाव शे. संघटनेचे ग्रा. प. सदस्य रवीचंद कुंभारे यासह भाजप, शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.यावेळी कोरपना काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी सभापती श्रीधरराव गोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, विठ्ठलराव थिपे, काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षा नंदाताई बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सुरेश पा. मालेकर, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, माजी संचालक भाऊजी चव्हाण, महिला अध्यक्षा आशाताई खासरे, माजी जि. प. सदस्य विनाताई मालेकर, मीना गेडाम, वहाब भाई, रसूल पटेल, गणेश गोडे, विक्रम येरणे, प्रा. आशिष देरकर, दिपक खेकारे, शैलेश लोखंडे, रोशन आस्वले, रोशन मरापे, प्रशांत लोढे यासह कोरपना काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने महिला, शेतकरी, शेतमजूर, युवक नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

कोरपनातील बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...

प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम !

चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...