Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अखेर कोरपना तहसीलदार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*

 

*कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची 15 दिवसांची मुदत असताना त्यापूर्वी सरपंच निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली होती. त्यामुळे उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पत्र देऊन कोरपना तहसीलदार यांनी घेतलेली सरपंच निवड सभा रद्द करावी तसेच तहसीलदार यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी केली होती. या तक्रारीची राज्य शासनाने दखल घेत कोरपना तहसीलदार व्हटकर यांना 27 सप्टेंबर रोजी निलंबित केले आहे.डॉ. विनायक विठ्ठलराव डोहे, उपसरपंच कढोली खुर्द यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की,ग्रामपंचायत कढोली खुर्द ता. कोरपना जि. चंद्रपूरच्या सरपंच सौ. निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सौ. सीताबाई पंधरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी अपात्र ठरविण्यात आले होते. या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार यांच्यासह  संबंधित सर्वाना देण्यात आले होते. तरीही तहसीलदार यांनी 19 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीकरिता 26 ऑगस्ट 2024 रोजी सभा घेतली व काँग्रेस समर्थित उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली. अपिलाची मुदत 15 दिवस म्हणजे 27 ऑगस्ट पर्यंत असताना ती संपायच्या आत ही सभा घेण्यात आली आहे. तहसीलदार कोरपना यांनी पैसे खाऊन, एकतर्फी आदेश काढून घाईने सभा घेतल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच सदर सरपंच निवड रद्द करावी.या तक्रारीची दखल घेत तहसीलदार कोरपना यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान कढोली खुर्द येथे माजी सरपंच व उपसरपंच यांनी भाजपा प्रवेश केल्याने आता प्रथमच सत्ता भाजपाकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

कोरपनातील बातम्या

*लखमापूर येथे भोई समाज सभागृहाचे लोकार्पण* *खा. प्रतिभा धानोरकर व आ. सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत लोकार्पण*

*लखमापूर येथे भोई समाज सभागृहाचे लोकार्पण* *खा. प्रतिभा धानोरकर व आ. सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत लोकार्पण* ✍️दिनेश...