Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *औद्योगिक राजुरा विधानसभा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*औद्योगिक राजुरा विधानसभा क्षेत्रातच रोजगाराच्या समस्या* *आजी-माजी लोकप्रतिनिधींनीच्या दुर्लक्षाने स्थानिकांचा रोजगार हिरावला* *कोरपना येथे सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बेरोजगारांचा हस्ते उदघाटन*

*औद्योगिक राजुरा विधानसभा क्षेत्रातच रोजगाराच्या समस्या*    *आजी-माजी लोकप्रतिनिधींनीच्या दुर्लक्षाने स्थानिकांचा रोजगार हिरावला*    *कोरपना येथे सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बेरोजगारांचा हस्ते उदघाटन*

*औद्योगिक राजुरा विधानसभा क्षेत्रातच रोजगाराच्या समस्या*

 

*आजी-माजी लोकप्रतिनिधींनीच्या दुर्लक्षाने स्थानिकांचा रोजगार हिरावला*

 

*कोरपना येथे सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बेरोजगारांचा हस्ते उदघाटन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना तालुका सिमेंट, लाइमस्टोन व आता कोळसा उद्योगा साठी प्रसिद्ध आहे. तालुका औद्योगिक दृष्ट्या भरभराटीस आला असून प्रगत सुद्धा झालाय मात्र येथील बेरोजगार युवकांच्या प्रश्न एरणीवर असून बेरोजगारांची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने नामवंत सिमेंट उद्योगाने या तालुक्यात उद्योग सुरु केले आहेत. तालुक्यातील नागरिकांनी आपल्या मुलांना रोजगार मिळेल या उद्देशाने शेती अल्प दरात दिल्या. त्या बदल्यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनाच नोकऱ्या देण्यात आल्या. त्यावेळेस गावकऱ्यांनी कोणताही दुष्परिणाम न लक्षात घेता उद्योगांचे स्वागतच केले. कारखाने सुरू झाले उत्पादनही कोट्यावधीची होऊ लागले मात्र त्याप्रमाणे येथील गावांच्या आणि नागरिकांच्या कुशल कामगार म्हणून नेमण्यास आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली. तुमच्याकडे कुशल कामगार नाही म्हणत स्थानिक कामगारांना डालवून त्यांच्यावर अकुशल कामगार म्हणून ठपका लावला जातो आणि परप्रांतीयांच्या भरणा केला जातो. हे असले प्रकार तीन दशकापासून सुरु असून स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने कधीच लक्ष वेधले नाही वा विधानसभेत मुद्दा उचलून धरला नाही. आजी माजी लोकप्रतिनिधींनी स्थानिक बेरोजगार युवकांना फक्त निवडणुकीच्या वेळेस रोजगाराचे गाजर दाखवत स्वतःची व स्वतःच्या कुटुंबीयांची आर्थिक भरभराटी करून घेतली व स्थानिकांना रोजगारापासून दूर ठेवले असा खळबळजनक गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी केला आहे.दि. २७ सप्टेंबर ला स्थानिक बस स्टॅन्ड चौकात मुख्य मार्गावर सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन बेरोजगार युवकांच्या हस्ते करण्यात आले. जनसंपर्क कार्यालय उदघाटन प्रसंगी तृतीयपंथींना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित तृतीयपंथींना मन सन्मान देत फुसे यांनी त्यांच्या आशीर्वादही घेतला. यावेळी बेरोजगार युवकांची वरात काढण्यात आली, वरातीत ''वक्त बदल गया है अब बेटीया नही लडके माँ-बाप पर बोझ है'' अशी हातात स्लोगन बोर्ड घेऊन स्थानिक बेरोजगारांनी वास्तव्य लक्षात आणून दिले. बेरोजगारांची वरात भूषण फुसे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडकली. कुशल असो वा अकुशल यानंतर स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून न दिल्यास उद्योग सोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींची हयगय केली जाणार नाही सज्जड इशारा देत या आशयाचे निवेदन फुसे यांनी तहसीलदारांना दिले. यानंतर बेरोजगार युवक, महिला व उपस्थित नागरिकांना फुसे यांनी मार्गदर्शन केले. रोजगाराविषयी भूषण फुसे यांनी सिमेंट उद्योगांसोबतच बेरोजगार युवकांच्या नावावर राजकारण करणाऱ्या आजी माजी लोकप्रनिधींचा समाचार घेतला. आजी माजी लोकप्रनिधींनी वेळीच स्थानिकांना स्थानिकपातळीवर रोजगार देण्याचा प्रश्न विधानसभेत उचलून धरला असता तर येथील युवकांना रोजगारापासून वंचित राहावे लागले नसते व रोजगाराकरिता इकडेतिकडे भटकावे लागले नसते असे म्हटले. यावेळी हजारोंच्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता. फुसे यांच्या रोजगाराविषयी खडे बोल बोलल्याने बेरोजगार युवकांमध्ये नवचेतना जागृत झाली असून येणाऱ्या निवडणुकीत बेरोजगार युवक सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या कडे आकृष्ट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...