Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *सरकार तुम्हारी है अक्षम...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले*

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे*    *सरकारी कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले*

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे*

 

*सरकारी कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले*

 

*सर्वसामान्य नागरिक कार्यालयात जा-ये करत झिझवत आहे चपला*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-देशात तरुणांनी दारू पिऊ नये, व्यसनाधीन होऊ नये म्हणून दारूबंदी किंवा अनेक उपक्रम राबवले जातात. कोरोना काळानंतर महाविकास आघाडी सरकारने महसूल वाढावा याकरिता जागोजागी बियर शॉपी सुरु करण्याचे धोरण अवलंबिले. परिणामी आता दारू हि सुकर झाली असून वैध व अवैध मार्गाने सर्वत्र उपलब्ध आहे. शासनाला दारू पासून किती महसूल मिळतोय हा भाग वेगळा मात्र सरकारी कर्मचारीच कार्यालयात दारू पिऊन कर्तव्य बजावत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. कोरपना पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना एका बार मध्ये प्याला घेतल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. गोंडपिपरी, राजुरा व जिवती तालुक्यातील सरकारी कार्यालयात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. जिवती तालुक्यात ९० टक्के कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. वीज बिल ठकवल्यास वीज कापण्यात सामान्य लोकांना कायदा शिकवत हयगय करत नसणारे महावितरणचे कर्मचारी सामान्य लोकांचे वीज कनेक्शन कापून टाकतात, हा नित्याचाच प्रकार. व नंतर हेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात बसून पत्त्याचा डाव मांडल्याचे व्हिडीओ सुद्धा मध्यन्तरी समाज माध्यमावर झळकले होते.एकीकडे सर्वसामान्य नागरिक कामानिमित्य कार्यालयात जा-ये करत चपला झिझवत आहेत तर दुसरी कडे सरकारी नोकरीचा माज आलेले काही अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्यांना वेठीस धरून कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळणे, टाईमपास करणे असले प्रकार करत असून तुमचे सरकार असल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास अक्षम ठरत नसेल तर आम्ही असल्या कर्मचाऱ्यांचे थोबाड रंगविण्यात मात्र सक्षम आहो असा सज्जड इशारा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे. अश्या स्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे शासनाच जबाबदार असल्याचाही इशारा भूषण फुसे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

राजुरातील बातम्या

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा* ✍️दिनेश...

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध*

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-- हिंदवी...