Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *ST बसच्या गळतीला ''ताडपत्री''...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*ST बसच्या गळतीला ''ताडपत्री'' चा उपाय* *ST बस वर लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचे बॅनर मात्र ''चकाचक''* *कमिशनच्या हौसेपायी बस स्टॅन्ड तोडून नवीन बस स्टॅन्ड बनवणाऱ्या सरकारची बससेच्या डागडुजीला कात्री - भूषण फुसे*

*ST बसच्या गळतीला ''ताडपत्री'' चा उपाय*    *ST बस वर लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचे बॅनर मात्र ''चकाचक''*    *कमिशनच्या हौसेपायी बस स्टॅन्ड तोडून नवीन बस स्टॅन्ड बनवणाऱ्या सरकारची बससेच्या डागडुजीला कात्री - भूषण फुसे*

*ST बसच्या गळतीला ''ताडपत्री'' चा उपाय*

 

*ST बस वर लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचे बॅनर मात्र ''चकाचक''*

 

*कमिशनच्या हौसेपायी बस स्टॅन्ड तोडून नवीन बस स्टॅन्ड बनवणाऱ्या सरकारची बससेच्या डागडुजीला कात्री - भूषण फुसे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-दि. २१ सप्टेंबर २०२४) -मागील जवळपास १० वर्षांपासून कमिशनच्या हौसेपायी चांगल्या स्थितीत असलेले बस स्टॅन्ड पाडून नवीन बस स्टॅन्ड बनविणे, मतांचे राजकारण करण्याकरिता शासनाच्या तिजोरीला विनाकारण आर्थिक बोझा वाढविणाऱ्या योजना राबविणे, असले प्रकार फक्त आपले सरकार राज्यात राहावे म्हणून सरकार राबवित आहे. सरकारने महिलांकरिता एसटी बस प्रवासात अर्ध्या तिकीटाची सोय करून दिली, महिलांना लाडकी बहीण मानणाऱ्या शासनकर्त्यांना आपली बहीण बस मध्ये सुखरूप प्रवास करीत आहे कि नाही हेही ठाऊक नाही. सध्या बहुतांश एसटी बसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली दिसून येत आहे. एसटी बस चे वरच्या टपावर ताडपत्री लावून बस चालवत असल्याचे व्हिडीओ सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी सोशल मीडियावर टाकले आहे. भूषण फुसे यांनी सरकारच्या खोट्या योजनेला बळी न पडता या सरकारला खाली पाडण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडिओत बघू शकता एसटी बसला ताडपत्री लागली आहे, जागोजागी डागडुजी आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे फोटो असलेले बॅनर मात्र चांगल्या अवस्थेत आहे.  

 

बसचे छत चक्क हवेत उडालयाची चित्रफित झाली होती वायरल

काही दिवसांपूर्वी गडचिरोली - अहेरी मार्गावर एका बसचे छत चक्क हवेत उडाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात वायरल झाला होता. तरी देखील महामंडळांने बसेस ची दुर्दशा आजपावेतो न सुधरवता वायरल व्हिडीओ ची दाखल म्हणून अभियंत्यांवर नाहक कारवाई करत स्वतःची पाठ थोपवून घेतली होती. तसेच अहेरी आगाराच्या बसमध्ये सुद्धा भर पावसात चालक एका हातात स्टिअरिंग तर दुसऱ्या हाताने वायपर फिरवत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. खिळखिळ्या बसेसची वाट कठीण असून प्रवाश्याना हाल अपेष्टा सहन करत प्रवास करावा लागत आहे.

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

राजुरातील बातम्या

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले*

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू...

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा* ✍️दिनेश...

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध*

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-- हिंदवी...