Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *उपबाजार आवार चंदनखेडा...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे  भूमिपूजन संपन्न*    *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे  भूमिपूजन संपन्न*

 

*कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती अंतर्गत उपबाजार आवार चंदनखेडा येथे नुकतेच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी वे-ब्रिज काटा बसविण्यात आला असून आज  गुरूवार दिनांक 12/09/2024 ला कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री. रवींद्रभाऊ शिंदे माजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर यांचे शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय  भास्कर लटारी ताजणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती तसेच सहउद्घाटक गजानन दिनाजी उताने बांधकाम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती  प्रमुख पाहुणे सौ.अश्लेषा मंगेश भोयर (जीवतोडे )  उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती.संचालक  परमेश्वर ताजणे.  शरद जांभुळकर श्यामदेव कापटे कान्होबा तिखट  मनोहर आगलावे  राजेंद्र डोंगे .राजु आसुटकर सौ. शांताबाई रासेकर  चंदनखेडा ग्रामपंचायतचे सरपंच नयन जांभुळे मुधोली ग्रामपंचायतचे सरपंच बंडू पाटील नन्नावरे, अडते मनिष सारडा, व्यापारी महेश घोडमारे, विकास मगरे, किशोर निखार आणि बाजार समितीचे कर्मचारी वृंद  विठ्ठल टोंगे, विलास पालकर, राजपाल भागवत, हनुमान मगरे, यासोबत परिसरातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्रभाऊ शिंदे म्हणाले, की बाजार समितीचे संचालक मंडळाचे नियमितपणे बाजार समितीच्या कामकाजावर लक्ष ठेवून बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टीने समोर नेण्याचे कार्य करीत असून यांचे संपूर्ण श्रेय बाजार समिती पदाधिकारी व संचालक मंडळ व अधिकारी यांना देण्यात येत आहे. तसेच जिथेपण आवश्यकता असेल तिथे भविष्यात शेतकरी बांधव यांच्या व बाजार समितीच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींची मदत घेऊन विकासाची घोडदौड सुरू ठेवू असे रवींद्र शिंदे पुढे म्हणाले.यावेळी बाजार समितीचे सभापती  भास्कर लटारी ताजने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, की बाजार समितीचे उपबाजार आवार चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांची मुख्य बाजारपेठ असून येथे प्लँटफार्म  व लिलाव शेडची कमतरता जाणवत होती. शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेता सर्व संचालक मंडळ कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच रविंद्रभाऊ शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व विकासात्मक दृष्ट्या मदत घेण्याची सूचना करीत असल्याने आम्हाला विकासात्मक कामाला गती मिळत आहे. याचप्रकारे बाजार समितीचे सर्व संचालक व कर्मचारी वृंद शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करीत राहील.  यापुढे सर्व शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल उपबाजार आवार चंदनखेडा येथे विक्रीस आणावा असे आवाहन सभापती महोदय यांनी केले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* *भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा. ) शहर कार्यकारणीची बैठक संपन्न*

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा....