Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *आ. सुभाष धोटेंनी घेतला...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-- महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राजुरा विधानसभा मतदारसंघातील गोंडपिंपरी तालुका मुख्यालयाचे ठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम तातडीने करण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. यावर सभागृहात उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लवकरच संबंधित विभागाची बैठक आयोजित करून गोंडपिपरी येथे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे आमदार सुभाष धोटे यांनी आज गोंडपिपरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतला, पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या.गोंडपिपरी येथे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे जूने बांधकाम सन १९८२ मध्ये करण्यात आले होते परंतु सदर इमारत सध्यास्थितीत पूर्णतः जीर्ण झालेली असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर यांच्या दिनांक २१ मार्च २०२३ रोजीच्या संरचनात्मक लेखापरीक्षण अहवालानुसार ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचे निष्पन्न झाले असताना सुद्धा या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग व महसूल विभाग गांभीर्याने लक्ष न देता परिसरातील गोरगरीब रुग्णांच्या जीविताशी खेळ खेळण्याचा प्रकार सुरू असल्याने भविष्यात कधीही रुग्णांच्या जीविकास धोका होऊ शकतो. मोठी जिवीत हाणी होऊ शकते. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन आ. सुभाष धोटे यांनी सभागृहाच्या माध्यमातून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना इमारत बांधकाम करण्यास जागा कमी पडत असल्यास बाजूला असलेली जलसंपदा विभागाची वापरात नसलेली ९८ आर जागा तात्काळ आरोग्य विभागस करून घेण्याची कारवाई करण्याची आणि रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधकाम तातडीने पुर्ण करण्याची मागणी केली होती हे विशेष.यावेळी बैठकीला महसुल विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अपूर्वा बासुर (भा. प्र. से.), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार अगडे, जेष्ठ नागरिक सुरेश चौधरी, वासुदेव पाटील सातपुते, उपअभियंता किशोर येडे, भुमी अभिलेख राजेश धोंगडे, शहर अध्यक्ष राजू झाडे यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

गोंडपिपरीतील बातम्या

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...