Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *धोपटाळा फाटा ते डॉ....

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना शहरातील बसस्थानक परिसरात उडान पूल निर्मितीचे काम सुरू आहे. अनियोजनात्मक कामामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या मेन रोडवर ही गर्दी वाढली आहे. या गर्दी व वाहतुकीला पर्यायी मार्ग म्हणून धोपटाळा फाटा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतच्या रस्त्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी बार असोसिएशनचे अड श्रीनिवास मुसळे , अड पवन मोहितकर व नागरिकांनी केली आहे.कोरपना येथील बस स्थानकापासून शहरात प्रवेश करणारा मेन रोड हा प्रमुख मार्ग आहे. परंतु अलीकडे उडानपुलाचे काम व शहरात जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. यातच अरुंद रस्त्यामुळे अपघातही वाढले. या दृष्टीने धोपटाळा फाटा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतच्या रस्त्याची पक्क्या रस्त्यात रूपांतर करण्यात यावे अशी अपेक्षा वाहतूकदारांकडून होते. हा मार्ग झाल्यास विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व जाणाऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. तसेच एकाच रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. हा पूर्वीपासूनच पर्यायी रस्ता आहे. मात्र त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातल्या त्यात आता या रस्त्याचा धोपटाला फाट्यावरील भाग बरोबर समतल नसल्याने वाहतूकदारांना अडचणीचे ठरते आहे. या अनुषंगाने महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित कंट्रक्शन कंपनीने हा मार्ग कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत सुस्थितीत बनवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

शहरातच प्रमुख बाजारपेठ व कार्यालये

कोरपना.ता.प्र. मुख्य शहरातच आठवडी बाजार, मुख्य बाजारपेठ, तहसील कार्यालयासह प्रमुख कार्यालये , मोठी नागरी वस्ती व कातलाबोडी, हातलोणी, कुकुडबोडी, केरामबोडी, सिंगारपठार, तीर्थक्षेत्र घाटराई , येरगव्हण , बोरगाव बु, बोरगाव खुर्द आदी गावाकडे जाणारे मार्ग जोडले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे या पर्यायी रस्त्याची नितांत गरज आहे.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

कोरपनातील बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...

प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम !

चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...