Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *अल्पसंख्यकांनो सावधान...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*अल्पसंख्यकांनो सावधान भाजप नंतर काँग्रेस च्या खासदार ताई पेरतंय जातीयवादीचे बियाणे - भूषण फुसे*

*अल्पसंख्यकांनो सावधान भाजप नंतर काँग्रेस च्या खासदार ताई पेरतंय जातीयवादीचे बियाणे - भूषण फुसे*

*अल्पसंख्यकांनो सावधान भाजप नंतर काँग्रेस च्या खासदार ताई पेरतंय जातीयवादीचे बियाणे - भूषण फुसे*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:- ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ असो की गडचिरोली, या दोन्ही ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करीत आहेत. ही परंपरा आता खऱ्या अर्थाने बदलण्याची वेळ आली आहे, असे म्हणत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन कुणबी महाधिवेशनात नुकतेच केले.ब्रम्हपुरी येथे हे अधिवेशन झाले. वडेट्टीवार हे अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधित्व करतात हे येथे उल्लेखनीय. रविवारी ८ सप्टेंबर रोजी ब्रम्हपुरी येथे झालेल्या कार्यक्रमाला चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा वडेट्टीवार यांच्या काँग्रेस पक्षातील विरोधक प्रतिभा धानोरकर यांच्यासह कुणबी समाजातील नेते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांना ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून पराभूत करा, असे आवाहन केले.काही वर्षे ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीत बहुसंख्य समाजाचे प्रतिनिधित्व अल्पसंख्य समाजाचे लोक करीत आहेत, ही परंपरा बदलण्याची हीच खरी वेळ आहे. कुणबी समाज काही राजकारणी लोकांच्या भूलथापांना बळी पडतो. आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदला, असे जाहीर आवाहन धानोरकर यांनी केले. वडेट्टीवार यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी टीका केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अल्पसंख्यांक समाजाबद्दल काँग्रेस च्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या सदर व्यक्तव्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी सर्व जाती धर्मातील अल्पसंख्यकांना भाजप नंतर आता काँग्रेस पासूनही सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस मध्ये सुद्धा कुणबी फॅक्टर चे जातीवाद सुरु असून यामुळे आज वड्डेटीवार बद्दल प्रतिभा धानोरकर असं बोलत असून उद्या अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, आदिवासी, मुस्लिम, जैन, पारशी व इतर अल्पसंख्यकांना सुद्धा असे लोक राजकारणात येऊ न देता आजही गुलामगिरीत ठेवण्याची यांची मानसिकता असल्याचे यावरून दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत माझे पती चे अवकाळी निधन झाले असे इमोशनल कार्डच्या आडून कुणबी कार्ड खेळल्या गेले. अल्पसंख्याक समाजातील लोकांनी मोदी नकोच म्हणत एक महिला म्हणून प्रतिभा धानोरकर याना खासदार बनवून लोकसभेत पाठविले. मात्र जनतेची कामे न करता आता आपण जनप्रतिनिधी आहोत हे भान विसरून आपण कुणबी आहो असे बोलण्याने सर्व अल्पसंख्यांक समाजामध्ये नाराजी उमटली असून असले जाती कार्ड खेळणाऱ्या सत्तेच्या लवकरच माज आलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना सर्व अल्पसंख्यांक समाजांनी मिळून येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवावा, ओबीसी समुदायातील कुणबी वगळता बाकीच्यांनी काय यांच्या सतरंज्या उचलायचा का असा बोचक टोलाही सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

चंद्रपूरतील बातम्या

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन*

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर...

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट*

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट* ✍️दिनेश...

*हाजी अली गोळीबारात ठार*

*हाजी अली गोळीबारात ठार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर :-मागील काही दिवसापासून चंद्रपुरात सातत्याने...