Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *घरकुलाचे पैसे उपलब्ध...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने*

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने*

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली :- सावली तालुक्यामध्ये मोदी आवास योजना,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना,रमाई आवास योजना इत्यादी योजने अंतर्गत ग्रामीण भागात घरकुलांचे कामे सुरु आहेत.मात्र शासनाने निधी उपलब्ध करून नं दिल्यामुळे ग्रामीण भागातील घरकुलांचे रखडलेली आहे.शासन निधी केव्हा देणार या विवंचनेत जनता असून शासनाच्या कारभाराला कंटालेली दिसुन येत आहे.मागील वर्षांपासून सामान्य गरीब माणसांना घरकुले मंजूर झालीत आपल्या जवळील पैसे खर्च करून लोकांनी घरे बांधली,जवळील सर्व पैसा खर्च केला.दुकानदारांचे देणे बाकी आहे,त्यामुळे दुकानदार सुद्धा साहित्य टाकण्यास टाळाटाळ करीत आहे.सुंदर घरांचे स्वप्न मृगजळ ठरत आहे.या पावसात लोकांना राहावे लागते,त्यामुळे जनतेत सरकार विषयी प्रचंड नाराजी आहे.ग्रामीण भागातील लोकांना घरकुल बांधकामासाठी दीड लाख रुपये मिळतात आज रेती, लोहा, सिमेंट, मजुरी यांचे भाव आकाशाला भिडलेले आहेत.एवढ्या थोड्या पैशात घरकुलाचे बांधकाम करून शक्य नाही,त्यातही अनेक वर्षांपासून घरकुलाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलेली नाही. तटपुंज्या पैशात घरकुल बांधायचे कसे असा प्रश्न घरकुल धारकांना पडलेला आहे.वाढती महागाई व तटपुंजी शासनाची मदत याच्या संयुक्त मेळ जुडवितांना सामान्य नागरिकांना मोठे कष्ट करावे लागत आहे.सावली तालुक्यातील बहुतांश घरकुलाचे काम अर्धवट आहे.शासनाने पैसे न दिल्यामुळे गरीब जनतेचि मोठी नुकसान होत आहे. शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली यावर करोडो रुपये खर्च करण्यास मान्यता दिली.मात्र घरकुल धारक लाभार्थीवर अन्याय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन घरकुल धारकांचे पैसे त्वरित देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.शासन सदर पत्राकडे लवकरात लवकर लक्ष्य देईल का ? याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष्य लागलेले आहे.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...