Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *अवैध दारू बंदीसाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-राजुरा तालुक्यातील मौजा पेलोरा येथील महिलांनी सरपंच अरूणा विनोद झाडे, पोलीस पाटील माधुरी खुजे , तंटामुक्त अध्यक्ष वसंता भोयर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन राजुरा येथे धडक देत गावात सुरू असलेल्या अवैध दारू दुकानांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरली. गावातील महिलांनी अवैध्य दारू विक्रेता १) बुधाजी चेन्नुरवार २) गणेश टेकाम ३) शोभा टेकाम (सोयाम) ४) पत्रू टेकाम ५) सुनिता गणपती सिडाम ६) इंदिरा आत्राम यांना दारू न विकण्यास वारंवार सूचना देऊन ही त्यांनी दारू विकणे बंद केलेले नाही व शोभा टेकाम नामक महिलेनी अश्लील शिवीगाळ केली. दारू हि पेल्लोरा गावात बाजीराव नगर चौकात विकली जाते. व तिथे लहान मुले, मुली व शाळेत जाणारे विधार्थी ये जा करत असतात. आज महाराष्ट्रात बदलापूरमध्ये बलत्कार झालेली घटना पाहता अशा घटनाना दारूमुळे वाव मिळू शकते. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांवर दोन दिवसात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.यावेळी पेल्लोराच्या सरपंच अरुणा बिनोद झाडे, पोलीस पाटील माधुरी प्रमोद खुजे, तमुस अध्यक्ष वसंता मारोती भोयर, कृ. उ. बा. स. संचालक विनोद झाडे, नंदकिशोर अडबाले, उज्वला रामदास अडबाले, सींधुबाई गणपत वडस्कर, संध्या बंडु पेंदोर, शशिकला गजानन मडावी, देवकाबाई देरकर, सुरेखा पेंदोर, माधुरी मट्टे, वैशाली टेकाम, कविता टेकाम, रेखा गौरकर, वंदना आत्राम, दिपाली सुरतेकर, रेखा टेकाम, ज्योती मळावी यासह पेल्लोरा येथील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...