Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *बदलापूर अत्याचार विरोधात...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन*

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन*

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणा-या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अमानवी कृत्याविरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. ज्या शाळेत हे अत्याचार झाले ती शाळा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांची आहे. सत्ताधारी लोकांशी संबंधित लोक यामध्ये सहभागी असल्याने पोलीस प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या आईची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसांना त्या गरोदर मातेला ११ तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. हे पोलीस आणि सरकारच्या गलथान कारभाराचे आणि असंवदेशीलतेचे ज्वलंत उदाहरण आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यातच माता, भगिनी, महिला सुरक्षित नाही तर राज्यातील इतर भागात कायदा व सुव्यवस्था कशी असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दि. २० ऑगस्ट रोजी या घटनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बदलापूर मध्ये आंदोलन करून रेल रोको केला. पण सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असताना स्थानिक नागरिकांनी हे प्रकरण लावून धरल्याने सरकारला नाईलाजाने कारवाईला सुरुवात करावी लागली.राज्यभरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींवर अत्याचार सुरु आहेत. सरकार आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. महिला मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बदलापूरच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. म्हणून आधी महाविकास आघाडीची जागावाटपाची बैठक रद्द करून नेत्यांनी राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि महिला सुखक्षेच्या मुद्यावर चर्चा करून या असंवेदनशील सरकारविरोधात दि. २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी च्या प्रमुख नेत्यांच्या निर्देशास सकारात्मक प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्हातील महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी, उद्योजक, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन हा महाराष्ट्र बंद यशस्वी करावा असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्षा बेबीताई उइके, शहर जिल्हाअध्यक्ष दीपक जयस्वाल, शिवसेना (ऊ. बा. ठा. ) जिल्हाध्यक्ष संदीप गिरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र शिंदे, सि. आय. टी. यू . चे. प्रा. रमेशचंद्र दहिवडे आणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिलीप चौधरी यांनी आवाहन केले.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

चंद्रपूरतील बातम्या

*अल्पसंख्यकांनो सावधान भाजप नंतर काँग्रेस च्या खासदार ताई पेरतंय जातीयवादीचे बियाणे - भूषण फुसे*

*अल्पसंख्यकांनो सावधान भाजप नंतर काँग्रेस च्या खासदार ताई पेरतंय जातीयवादीचे बियाणे - भूषण फुसे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट*

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट* ✍️दिनेश...

*हाजी अली गोळीबारात ठार*

*हाजी अली गोळीबारात ठार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर :-मागील काही दिवसापासून चंद्रपुरात सातत्याने...