Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *काँग्रेस नेत्या माजी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*काँग्रेस नेत्या माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांना जीवे मारण्याची धमकी* *प्राचार्य डॉ.अनिल मुसळेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद*

*काँग्रेस नेत्या माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांना जीवे मारण्याची धमकी*    *प्राचार्य डॉ.अनिल मुसळेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद*

*काँग्रेस नेत्या माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांना जीवे मारण्याची धमकी*

 

*प्राचार्य डॉ.अनिल मुसळेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-नांदा येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा येथील अध्यक्ष सुनीता लोढीया यांना त्यांच्याच संस्थेतील सचिव तथा प्राचार्य अनिल मुसळे यांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत गडचांदूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.संस्थेत गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे अनेक दिवसांपासून अध्यक्ष व सचिवांमध्ये वाद सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी हा वाद आणखी चव्हाट्यावर आला असून पाऊस लागल्याने व्यवस्थापन कार्यालयात बसण्याकरिता अध्यक्ष सुनीता लोडिया यांनी सचिव अनिल मुसळे यांना कार्यालयाची चावी मागितली असता ती चावी देण्यास मुसळे यांनी नकार दिला व शिवीगाळ करून निघून गेल्याचा आरोप सुनिता लोढीया यांनी केला आहे. पुढील तपास गडचंदूर पोलीस करीत आहे.

 

*प्रतिक्रिया*

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा या संस्थेचे नांदा येथे श्री. प्रभू रामचंद्र विद्यालय, गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बीएड कॉलेज, इंग्लिश मीडियम शाळा आहेत. काही दिवसापूर्वी शाळेचे मुख्याध्यापक अनिल मुसळे व सहाय्यक शिक्षिका योगिता कुळमेथे या दोघांवरही बोगस शिक्षक भरती प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संस्थेमध्ये शिक्षक भरतीत मोठा घोळ व आर्थिक अफरातफर होत असल्याचे लक्षात आल्याने मी स्वतः शाळेच्या कारभाराकडे लक्ष देणे सुरू केले आहे. ही बाब मुसळे यांना पचनी पडत नसल्याने स्वातंत्र्यदिनी मला कारने कट मारून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

- सुनीता लोढिया, अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...