Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आदिवासी समाज व महानायकांचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* *भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा*

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे*    *भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा*

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे*

 

भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-वीर बाबुराव शेडमाके चौक, भेंडवी येथे आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम आदिवासी समाज बांधवांनी वाजतगाजत, लोकनृत्य करीत रॅली काढून जय सेवा आणि आदिवासी अस्मितेचा गजर करण्यात आला.  यावेळी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आदिवासी महानायक वीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर आदिवासी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला महोत्सव सादर करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात आ. सुभाष धोटे म्हणाले की, आदिवासी समाज निसर्गपूजक, शुध्द पर्यावरणप्रेमी समाज आहे. जगात अनेक स्थित्यंतरे घडत असतानाही आदिवासी समाज आपल्या संस्कृतीला जपत प्रगती करीत आहे. त्यामुळे आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष, आदिवासी संस्कृती जगाला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. आदिवासी महानायकांच्या प्रेरणेने समाजाने प्रगती करावे असे आवाहन केले. तसेच भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे १ एकर जागेवर भव्य स्मारक बांधण्याची घोषणाही त्यांनी केली.या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आकाश भाटीया, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, आदिवासी नेते भेंडवीचे सरपंच श्यामराव पाटील कोटणाके, सोनापूरचे सरपंच जंगू पाटील येडमे, उपसरपंच रमेश मडावी, रामचंद्र कोरवते, बारसुजी आत्राम, विठ्ठल मडावी, गोपाल कोटणाके, रामजी राठोड, युवराज मशाखेत्री, सुरेश जुमनाके, देवराव कोटणाके, लिंबाराव कुमरे, करण मडावी, क्रिष्णा कोटणाके, गोविंदराव मडावी, कर्लु सोयाम, माणकु कन्नाके, आनंदराव सिडाम, यादव मडावी, माजी सरपंच चिन्नुबाई मंडीगा, सुगंधा जुमनाके, तानीबाई मडावी, रेश्मा आत्राम, अंबुजा सिमेंटचे सिद्धेश्वर जंपलवार, युवक काँग्रेसचे उमेश गोनेलवार, आकाश मावलीकर, निरज मंडल, सुधाकर सोयाम सर यासह आदिवासी समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...