Reg No. MH-36-0010493

Wednesday February 05, 2025

35.91

Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *सायकलने 18000 किलोमीटर...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*सायकलने 18000 किलोमीटर चारधाम यात्रा प्रवास करून चंद्रपूर परत आलेल्या मयूर देऊरमलेचा डॉ. विश्वास झाडे यांनी केला सत्कार*

*सायकलने 18000 किलोमीटर चारधाम यात्रा प्रवास  करून चंद्रपूर परत आलेल्या मयूर देऊरमलेचा डॉ. विश्वास झाडे यांनी केला सत्कार*

*सायकलने 18000 किलोमीटर चारधाम यात्रा प्रवास  करून चंद्रपूर परत आलेल्या मयूर देऊरमलेचा डॉ. विश्वास झाडे यांनी केला सत्कार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-आजची तरुणाई भरकट चाललेली आहे ,नशेच्या वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या आरोग्य खराब करत आहे म्हणजेच तरुणाई व्यसनाधीन होत चालली आहे असे सगळे आरोप एका बाजूला होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील पौंभुर्णा तालुक्यामध्ये राहणारा घनोटी या छोट्या गावातील  23 वर्षीय मयूर देऊरमले यांनी 18000 किलोमीटर सायकलने प्रवास करून बारा ज्योतिर्लिंग व चार धाम यात्रा पूर्ण करून पाच महिन्यांमध्ये एक वेगळाच विक्रम स्थापित केला, चंद्रपूर येथे स्थानिक वरोरा नाका चौक मध्ये तो आला असता त्या ठिकाणी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष, जीवन ज्योती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, चंद्रपूरमधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विश्वास झाडे व त्यांच्या मित्र परिवाराने त्यांचे स्वागत व सत्कार केले.डॉक्टर विश्वास झाडे भारतातल्या लद्दाख, मुंबई , हैद्राबाद, गोवा,बंगलोर, नागपूर व इतर अनेक मध्ये मॅरेथॉन  स्पर्धेत सुद्धा सहभागी झाले होते, तसेच चंद्रपुरातील पहिले आयरन मॅन म्हणून पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना शारीरिक खेळात आवड आहेच  हे दिसून येते. खेळातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढ होते असे त्यांनी म्हटले आहे. मयूरचा हा सायकल प्रवास नक्कीच सर्व युवकांना प्रेरणादायी ठरेल,  असे डॉक्टर विश्वास झाडे यांनी सांगितले.. त्यांचा सोबत  सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवानंद साखरकर, प्राध्यापक श्याम हेडाऊ, झी मीडियाचे आशीष अंबाडे, सामाजिक कार्यकर्ते अमर रामटेके, दिक्षांत बेले व उपस्थित मित्रपरिवराने त्याचे स्वागत केले.

ताज्या बातम्या

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे  यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.* 04 February, 2025

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.*

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...