Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *खासदार धानोरकर यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*खासदार धानोरकर यांच्या मागणीला शासनाचा हिरवा कंदील. शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात समिती स्थापन*

*खासदार धानोरकर यांच्या मागणीला शासनाचा हिरवा कंदील.  शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात समिती स्थापन*

*खासदार धानोरकर यांच्या मागणीला शासनाचा हिरवा कंदील.

 

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात समिती स्थापन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध मागन्या संदर्भात शासनाकडे चर्चा करुन प्रसंगी अनेक वेळा आमदार असतांना विधानसभेत तर आता लोकसभेत मागणी केली त्यापैकी शिक्षकांसाठी जुन्या पेन्शन च्या मागणी संदर्भात महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन करुन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला हिरवा कंदील दिला आहे.चंद्रपूर लोसकभा क्षेत्रातील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकभिमुख अनेक मागण्या शासन दरबारी केल्या होत्या. त्यासंदर्भात शासनाने अनेक मागण्यांची पुर्तता देखील केली होती. प्रतिभा धानोरकर आमदार असतांना विधानसभेत शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी याकरीता विधानसभेत प्रश्न उचलून धरला होता. लोकसभेत देखील पहिल्याच अर्थसंकल्पीया भाषणा दरम्यान त्यांनी शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात आवाज उठविला होता. त्यांच्या मागणीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून त्यांसंदर्भात शासनाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षक आमदार समावेशित समिती स्थापन केली आहे. हि समिती जुनी पेन्शन लागू केल्यास शासनावर किती आर्थीक भार येणार या संदर्भात अभ्यास करुन शासनाकडे अहवाल सादर करणार आहे. भविष्यातील निवडणूका लक्षात घेता ही समिती स्थापन केली का? असा देखील प्रश्न या निमित्त्याने शिक्षकांना पडला आहे. परंतु खासदार धानोरकर यांनी या निर्णयाचे स्वागत करीत समिती या संदर्भात लवकर अहवाल सादर करुन 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आशा व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...