Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *२३ वर्षाच्या देशसेवेनंतर...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*२३ वर्षाच्या देशसेवेनंतर विजय शेंडे चे मायभुमीत हृदयस्पर्शी स्वागत व सत्कार*

*२३ वर्षाच्या देशसेवेनंतर विजय शेंडे चे मायभुमीत हृदयस्पर्शी स्वागत व सत्कार*

*२३ वर्षाच्या देशसेवेनंतर विजय शेंडे चे मायभुमीत हृदयस्पर्शी स्वागत व सत्कार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-शोर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा यांचा पवित्र संगम जिथे पहायला मिळतो ते क्षेत्र म्हणजे भारतीय सीमा सुरक्षा बल. चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा तालुक्यातील ब्लॅक गोल्ड व्हिलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सास्ती येथील विजय तुळशीराम शेंडे यांनी भारतीय सिमा सुरक्षा बल मध्ये सब इन्स्पेक्टर पदावर २३ वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त घेतली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या या भुमिपुत्राच्या सेवा निवृत्तीला संस्मरणीय करण्यासाठी आप्तस्नेहीजन, मित्रमंडळी, नातेवाईक आणि नागरिकांनी मोठय़ा उत्साहाने, जल्लोषात भव्य मिरवणूक काढुन पुष्पवर्षाव करीत, नाचत गाचत त्याचे जंगी स्वागत केले. सायंकाळी हाँटेल सिद्धार्थ येथे एका स्वागत सोहळ्यात आपल्या मायभुमीत विजयचा सपत्नीक ह्रदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना विजय ने सांगितले की, बालपणापासून सैनिक होऊन देशसेवा करण्याची सुप्त इच्छा होती. प्रचंड परिश्रमातुन भारतीय सिमा सुरक्षा रक्षक दलात भरती झालो आणि आयुष्याची २३ वर्षे सेवा दिली. यात पत्नी शिल्पा शेंडे ची अनमोल साथ मिळाली. तीनेही मुलगा शिववंश आणि मुलगी देवांशी यांचा बालपणापासून एकटीने समाजात स्वाभिमानाने वावरत मोठय़ा जिकिरीने सांभाळ केला. आता उर्वरित आयुष्य आनखी नव्या उमेदीने, ऊर्जेने  वेगळा पद्धतीने देशसेवेत व्यतीत करण्याचा मानस असल्याचे मत त्यांने व्यक्त केले आहे.विशेष म्हणजे विजय चा भाऊ अजय शेंडे हा देखील मागील २० वर्षापासून सीआरपीएफ मध्ये कार्यरत असून सध्या गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांशी दोन हात करीत आहे. एकाच कुटुंबातील हे दोन्ही भाऊ देशाच्या सैन्यात दाखल होऊन देशसेवा करीत आहेत ही अभिमानाची बाब आहे. सेवानिवृत्त सब इन्स्पेक्टर विजय शेंडे यांच्या स्वागत व सत्कार प्रसंगी माजी नगरसेवक सुभाष कोसनगट्टीवार, चांदा पब्लिक स्कूल च्या संचालिका स्मिता जिवतोडे, प्रधानाचार्या आम्रपाली पडोळे यांनी उपस्थित राहून त्यांच्या शोर्यगाथेवर प्रकाश टाकला. या प्रसंगी त्याचे कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रमंडळी, देशप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...