Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *शासकीय योजनांचा लाभ...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटका पर्यंत पोचवा : आमदार सुभाष धोटे* *महसूल पंधरवडय़ानिमित्य विरूर स्टेशन येथील नागरिकांशी विभागाने साधला संवाद*

*शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटका पर्यंत पोचवा : आमदार सुभाष धोटे*    *महसूल पंधरवडय़ानिमित्य विरूर स्टेशन येथील नागरिकांशी विभागाने साधला संवाद*

*शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटका पर्यंत पोचवा : आमदार सुभाष धोटे*

 

महसूल पंधरवडय़ानिमित्य विरूर स्टेशन येथील नागरिकांशी विभागाने साधला संवाद

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- तहसील कार्यालय राजुरा च्या वतीने विरूर स्टेशन येथे महसुल दिनाचे औचित्य साधून महसुल पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते म्हणाले की शासन आणि लाभार्थी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून महसूल विभाग भुमिका पार पाडत असतात. सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. मात्र अनेकदा विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील अगदी शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्यासाठी महसुल विभागाने अधिक परिश्रम घेण्याची गरज असून घरकुल योजना, निराधार योजना, आनलाईन पीकविमा, लाडली बहीण, वयोवृद्धांच्या योजना व अन्य योजनांसाठी गोरगरीब जनता सर्व्हर डाऊन तसेच विविध तांत्रिक अडचणीमुळे त्रस्त आहेत यावर तोडगा काढून तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले.या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गौड, विरूर स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष वाकडे, कृषी मंडळ अधिकारी चेतन चव्हाण, पशु वैद्यकीय अधिकारी तेलंग, कृ. उ. बा. स. संचालक सविता अजय रेड्डी, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, आकेवार जी, सुरेश पावडे, अजय रेड्डी, सरपंच अनिल आलाम, सरपंच सुरेखा आत्राम, उपसरपंच प्रीती पवार, कल्याणी गेडाम, धनराज चिंचोलकर, अरूण सोमलकर, अंबादास भोयर, भाऊजी जाभोर, बबन ताकसांडे, सुधाकर पेंदोर, रामभाऊ ढुमणे, चेतन जयपूर, प्रवीण चिडे, ज्ञानेश्वर मोरे, संभाशिव नागापुरे, नानाजी ढवस, लटारू नारनवरे, यासह अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान आ. सुभाष धोटे यांनी वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत राजुरा तालुक्यातील मौजा चिचबोडी आणि परिसरातील पुर आणि अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांची पाहणी केली आणि संपूर्ण विरूर स्टेशन परिसरातील  सतत पडणाऱ्या पावसामुळे उभ्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...