Home / चंद्रपूर - जिल्हा / *भर पावसात शिवसेनेचे...

चंद्रपूर - जिल्हा

*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकुन गुन्हे दाखल करावे व पुर्वेश वांढरेच्या परिवाराला आर्थिक साहय्य करुन दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी* *वरोरा येथील दूषित पाण्यामुळे मुलाचे मृत्यू प्रकरण

*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी*    *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकुन गुन्हे दाखल करावे व पुर्वेश वांढरेच्या परिवाराला आर्थिक साहय्य करुन दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी*    *वरोरा येथील दूषित पाण्यामुळे मुलाचे मृत्यू प्रकरण

*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी*

 

*वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकुन गुन्हे दाखल करावे व पुर्वेश वांढरेच्या परिवाराला आर्थिक साहय्य करुन दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी*

 

*वरोरा येथील दूषित पाण्यामुळे मुलाचे मृत्यू प्रकरण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा:-दूषित पाण्यामुळे पुर्वेश वांढरे ह्या मुलाचा मृत्यू झाल्याने पाणीपुरवठा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा समन्वयक वैभव डहाणे आज (दि.१९) ला पहाटे टॉवरवर चढले . सदर मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या विदर्भ मल्टी सर्व्हिसेस या कंपनीविरोधात डहाणे यांनी शिवसेना स्टाईल विरुगिरी आंदोलन पुकारले . सदर आंदोलन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात आले.वरोरा शहरातील मालवीय वार्ड येथील पूर्वेश वांढरे ह्या मुलाचा दि.५ जुलै २०२४ रोजी दूषित पाणी पिल्यामुळे मृत्यू झाला. या मृत्यूला विदर्भ मल्टी सर्व्हिसेस ही कंत्राट कंपनी कारणीभूत आहे. त्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकून या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच पूर्वेशच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, यासाठी शिवसेना वरोरा विधानसभा समन्वयक वैभव डहाणे हे तहसील कार्यालयातील टॉवरवर चढले.विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांनी भर पावसात ही शिवसेना स्टाईल विरुगिरी सुरू करुन मागण्या मंजूर झाल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा इशारा दिला.दरम्यान, वैभव डहाणे यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंदोलन स्थळी जिल्हाप्रमुख रविद्र शिदे दाखल होतात वरोरा विधानसभाप्रमुख मुकेश जिवतोडे व सर्व शिवसैनिक तसेच काँग्रेस व एनसीपी (शरद पवार गटा) एकत्र आले. वरोरा उपविभागीय कार्यालय येथे उपविभागीय आधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या सोबत सदर आदोलना विषयी चर्चा करुन प्रशासनाचा हलगर्जीपणा आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, नागरिकांवरील अन्याय सहन करणार नाही, याबाबत कायदेशीर कार्यवाही करावी व पुर्वेश याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच त्यात दुषित पाण्याबाबत मृत्यु झाला असे आढळून आल्यास तात्काळ  संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी, असे नगर पालिका प्रशासन यांचे कडुन लेखी लिहून घेतले. त्याच प्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या शॅापल मध्ये हेराफेरी करुन कसुर करणाऱ्या विरुध्द तात्काळ कार्यवाही व्हावी, याकरीता पुर्वेश चे वडील सुभाष वांढरे यांनी लेखी तक्रार वरोरा पोलिस स्टेशन येथे दाखल केली.  सदर प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी कमेटी स्थापन करावी, या मागणी करीता वरोरा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात त्यांनी सुध्दा कमेटी नेमण्याचे आश्वासीत केले.त्यानंतर आंदोलनकर्ते शिवसेनेचा पक्षाचे विधानसभा समन्वयक वैभव डहाने यांनी जिल्हाप्रमुख रविद्र शिदे व विधानसभाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या समक्ष आंदोलनाची सांगता केली.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...

*९ आँगस्ट आदिवासी दिवस म्हणून शासकीय स्तरावर साजरा करा : आमदार सुभाष धोटेंची अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान मागणी*

*९ आँगस्ट आदिवासी दिवस म्हणून शासकीय स्तरावर साजरा करा : आमदार सुभाष धोटेंची अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान मागणी* ✍️दिनेश...