Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *सिनेट सदस्य गुरुदास...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्कार* *रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाऊंडेशन धुळे या संस्थेतर्फे जाहीर*

*सिनेट सदस्य गुरुदास कामडी  यांना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्कार*    *रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाऊंडेशन धुळे या संस्थेतर्फे जाहीर*

*सिनेट सदस्य गुरुदास कामडी  यांना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्कार*

 

*रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाऊंडेशन धुळे या संस्थेतर्फे जाहीर*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशन धुळे यांच्या कडून दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक व क्रीडा क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा जी.बी मुरारका कला व वाणिज्य महाविद्यालय शेगाव येथे दिनांक २८ जुलै २०२४ रोजी वितरित करण्यात येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. मनोहर पाटील, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद पवार प्रशाकीय अधिकारी डॉ. प्रविण गिरसे ,डॉ. संभाजी पाटील, राष्ट्रीय सल्लागार डॉ. संजय गोरे यांनी या वर्षीचा भारत शिक्षक रत्न पुरस्कार गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद तथा अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांना जाहीर केला आहे. गुरुदास कामडी हे सन्मित्र सैनिकी विद्यालय चंद्रपूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही गुरुदास कामडी यांना उत्कृष्ट शिक्षक २००९,महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक , दैनिक लोकशाही आदर्श शिक्षक २०१२,बेस्ट टिचर अवार्ड २०१७ अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  गुरदास कामडी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळील सुरवात केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ,भारतीय जनता यवा मोर्चा, विदर्भ भटके-विमुक्त एकता संघटना च्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन कार्यक्रमातून विविध कार्य केले आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व्यवस्थापन परिषद,अधिसभा सदस्य म्हणून विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण व विद्यार्थ्यांचें प्रश्न मांडले आहेत. विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्र, पंडित दिनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन,शारीरिक शिक्षण क्रीडा मंडळ सदस्य, संविधान सन्मान समरोह समिती सदस्य अशा विविध समितीवर कार्यरत आहेत.गुरुदास कामडी उच्च शिक्षण व माध्यमिक शिक्षण यावर केलेले कार्य व भटके - विमुक्त समाज प्रबोधन व विद्यापीठा क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फांऊंडेशन धुळे यांच्या कडून भारत शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात ये आहे.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

राजुरातील बातम्या

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा* ✍️दिनेश...

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध*

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-- हिंदवी...

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* *भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा*

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य...