Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *शिवसैनिकांनी सर्वसामान्य...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* *भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा. ) शहर कार्यकारणीची बैठक संपन्न*

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे*    *भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा. ) शहर कार्यकारणीची बैठक संपन्न*

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे*

 

भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा. ) शहर कार्यकारणीची बैठक संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-शिवसेनाप्रमुख वं. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला अंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्याचा महत्वपूर्ण संदेश दिला आहे. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे  प्रत्येक शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभाग घेवून त्यांच्या समस्या व मागण्या समजावून घ्याव्या. त्या समस्या व मागण्या निकाली काढण्याचा सतत प्रयत्न करावा. या कार्यातून शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे (वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र) यांनी केले.काल दि. १२ जुलै रोजी स्थानिक पक्ष कार्यालयात आयोजित (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भद्रावती शहर कार्यकारणीच्या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून  शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी शिवसेना नेते मिलींद नार्वेकर यांचा विधानपरीषद निवडणूकीत दणदणीत विजय झाल्याबद्दल केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकित तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल व जेष्ठ शिवसैनिक तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डूकरे यांनी सुध्दा समयोचित मनोगत व्यक्त केले.या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, जिल्हा युवासेना अधिकारी रोहण कुटेमाटे, जिल्हा युवासेना चिटणीस येशु आरगी, युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर तसेच जेष्ठ शिवसैनिक माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, शहर समन्वयक भुमेश वालदे, संघटक पंकज कातोरे, सहसंघटक साहेबराव घोरुडे, उपशहरप्रमुख अरुण घुगुल, विश्वास कोंगरे, संतोष माडेकर, उत्तम मजुमदार, विजय पारधे, प्रसिध्दीप्रमुख रवी कावळे, गोपाल सातपुते तथा विभाग प्रमुख अक्षय बंडावार, राजू बगडे, सतिश आत्राम, अभिजित बमनोटे, शंकर स्वान, शुभम पचारे, जय वरखडे, विशाल नारळे, निलेश आस्वले तसेच युवासेना शहर कार्यकारणीचे शहर अधिकारी मनोज पापडे, शहर चिटणीस समिर बल्की व माजी सैनिक सेलचे विजय तेलरांधे तथा इतर शहर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...