Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आ. सुभाष धोटेंच्या मागणीवर...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आ. सुभाष धोटेंच्या मागणीवर महसूलमंत्र्यांची मुंबईत बैठक : जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे महसूलमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश*

*आ. सुभाष धोटेंच्या मागणीवर महसूलमंत्र्यांची मुंबईत बैठक : जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे महसूलमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश*

*आ. सुभाष धोटेंच्या मागणीवर महसूलमंत्र्यांची मुंबईत बैठक : जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे महसूलमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. यावर महसूल व वन विभाग मंत्रालय मुख्य इमारत, पहिला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई येथे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अपर मुख्य सचिव (महसूल) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई, प्रधान सचिव (उद्योग), उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई, जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे, आयुक्त (कामगार), महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी, चंद्रपूर, प्रांत अधिकारी, राजुरा, जि. चंद्रपूर, विभागीय अधिकारी, एम. आय. डी. सी., चंद्रपूर, सहाय्यक आयुक्त (कामगार), चंद्रपूर, तहसिलदार, राजुरा / जिवती, उद्योग अधिकारी, चंद्रपूर आदी अधिकारी प्रत्यक्ष तसेच विडिओ काँन्फरंसींग द्वारा आनलाईन उपस्थित होते.यावेळी चंद्रपूर जिल्ह्य़ातील जिवती तालुक्यातील महसूली अभिलेख (संगणकीकृत) ऑनलाईन करणे, राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमीनीचा ऑनलाईन मिळणारा सातबारा पूर्ववत करून मिळणे. राजुरा शहरातील सर्व्हे क्र.१४९/९९ आजारी ४.०५ हेक्टर पैकी सरकार जमा आराजी ०.४० आर जागेवर अतिक्रमण हटविणे, अंबुजा सिमेंट कंपनी पूर्वीची (मराठा सिमेंट वर्क्स) व महाराष्ट्र शासन यांच्यात दि.१३.८.१९९९ रोजी झालेल्या नोंदणीकृत कराराचे उल्लंघन झाल्याने कंपनीचा करार रद्द करणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात येऊन मा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वरील विषयानुसार तातडीने कारवाई करून राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

राजुरातील बातम्या

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा* ✍️दिनेश...

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध*

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-- हिंदवी...

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* *भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा*

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य...