वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे चंद्रपूर विधानसभा, बल्लारपूर विधानसभा व वरोरा विधानसभा क्षेत्रात उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.चंद्रपूर विधानसभा क्षेत्राकरिता शिवसेनेचे जयदीप रोडे, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राकरीता जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राकरिता जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे , मुकेश जिवतोडे यांचे नावाची चर्चा आहे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संदीप गिऱ्हे यांचे दौरे सुरू आहेत. मुल बल्लारपूर विधानसभेला समोर ठेवून त्यांचे नियोजनबध्द काम सुरु आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात या पूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेचा उपाध्यक्ष शिवसेनेचा राहिला आहे. स्वबळावर शिवसेनेने येथे बरेच नगरसेवक निवडून आले आहेत. सन २०१४ मध्ये शिवसेना स्व बळावर लढल्याने शिवसेना उमेदवारास ५१००० हजार मताधिक्य घेतले होते.यामुळे या विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला चांगला वाव आहे. जयदीप रोडे हे मागील अनेक वर्षांपासून शहरात कार्यरत असून येथे सुपरिचित चेहरा आहे. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात रविंद्र शिंदे यांचे कार्य जोरदार सुरु आहे. रविद्र शिदे यांना सामाजिक,राजकिय व सहकार क्षेत्राचा अनुभव बघता त्यांची बाजु भक्कम असुन ते परिपक्व व मुसदी राजकारणी म्हणुन त्यांचे कडे बघितले जाते.वरोरा विधानसभा क्षेत्रात त्यांनी कोरोना काळापासून सतत काम करीत असुन सामाजिक उपक्रम राबवत पक्ष सघंटन सुध्दा मजबुतीने उभारले असुन प्रस्थापीताच्या विरोधात शिवसैनिकांना व पक्ष पदअधिकारी यांना सोबत घेवुन अनेक निवडणुका सतत जिंकल्या असुन विजयी रथ सुरुच आहे. मुकेश जिवतोडे हे सुध्दा जनसेवेत आहेतच.व हा मतदार शिवसेनेचा बालेकिल्ला सुध्दा राहला आहेत.
परत एकदा शिवसेनेची सत्ता बसविण्याकरीता चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहील. ना. उध्दव ठाकरे साहेब राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री बनावे, हिच आमची इच्छा आहे, चंद्रपुर जिल्यातील बल्लारशहा, वरोरा व चंद्रपुर या विधानसभावर आमचा दावा राहील असे जिल्हाप्रमुख रविद्रं शिदे यांनी स्पष्ट केले असुन याबाबत पक्षप्रमुखांचे जे आदेश देतील त्या आदेशाने निवडणुकांना समोर जावु परंतु संध्यास्तिथीत बल्लारशहा, वरोरा व चंद्रपुर विधानसभेवर शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचा दावा राहील. व याबाबत बुथ निहाय माहीती सुध्दा पुर्व विदर्भ सर्पक प्रमुख शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव साहेब याना दिली. असे जिल्हाप्रमुख रविद्रं शिदे यांनी सांगितले.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...