Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *जिल्ह्यात विविध चिटफंड...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*जिल्ह्यात विविध चिटफंड कंपन्याद्वारा जनतेची ५५० कोटी रुपयाची फसवणुक केलेली प्रकरणे प्रलंबित : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* *शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र* *फसवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील विविध चिटफंड कंपन्यावर कारवाई करून पैसे परत करण्याची

*जिल्ह्यात विविध चिटफंड कंपन्याद्वारा जनतेची ५५० कोटी रुपयाची फसवणुक केलेली प्रकरणे प्रलंबित : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे*    *शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र*    *फसवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील विविध चिटफंड कंपन्यावर कारवाई करून पैसे परत करण्याची

*जिल्ह्यात विविध चिटफंड कंपन्याद्वारा जनतेची ५५० कोटी रुपयाची फसवणुक केलेली प्रकरणे प्रलंबित : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे*

 

*शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र*

 

*फसवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील विविध चिटफंड कंपन्यावर कारवाई करून पैसे परत करण्याची मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा/भद्रावती:-महाराष्ट्र राज्यात सन २००७ ते २०२३ पर्यंत विविध चिटफंड कंपन्यांमार्फत युवा-युवती, माता भगीनी, जेष्ठ नागरीक यांची जवळपास ५० हजार कोटी रुपयाची फसवणुक झाली आहे. याच प्रकरणासह चंद्रपूर जिल्ह्यातील सन २०१३ ते २०२३ मधील आर्थिक गुन्हे शाखेकडे विविध चिटफंड कंपनीने जनतेची ५५० कोटी रुपयाची फसवणुक केलेली प्रकरणे प्रलंबित आहे, असा आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती तथा राजुरा जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी केला आहे. याबाबत एक पत्रच शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. सोबतच या संपुर्ण प्रकरणावर तात्काळ कार्यवाही करुन फसवणुक झालेल्या जनतेला न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना निवडणुकीच्या तोंडावर सुरु केलेली आहे. परंतु हे राज्य सरकारचे आमिष दाखविणारे सोंग असून राज्यातील सन २००७ ते २०२३ पर्यंत युवा, युवती, माता, भगीनी, जेष्ठ नागरीक शेतकरी शेतमजुर यांचे चिटफंड कंपन्यांमध्ये गुंतविलेले जवळपास ५० हजार कोटी रुपयाची फसवणुक झालेली आहे, असे असतांना सुध्दा त्यावर हे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहेत. यामध्ये या राज्य सरकारमधील अनेक मंत्री व आमदारांचा सुध्दा हात आहे.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील युवा, युवती, माता, भगीनी, जेष्ठ नागरीक व ग्रामिण भागातील शेतकरी, छोटे मोठे व्यापारी यांचे सन २०१३ ते २०२३ या दरम्यान चिटफंडच्या विविध कंपन्यांमध्ये ५५० कोटी रुपयांची फसवणुक एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात झालेली आहे. याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत असुन या विविध कंपन्यांपैकी मैत्री या चिटफंड कंपनीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील युवा, युवती, माता, भगीनी, जेष्ठ नागरीक व ग्रामिण भागातील शेतकरी, छोटे मोठे व्यापारी यांचे प्रलंबित असलेले ५५० कोटी पैकी १९४ कोटी रुपये फसलेले असुन अशा प्रकारच्या फसवणुकीचे विविध चिटफंड कंपन्यांवर आजपर्यंत चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेकडे ३७ गुन्ह्यांची नोंद झालेली असून ते गुन्हे तपासात प्रलंबित आहेत. या ३७ गुन्ह्यामध्ये मैत्री कंपनीचे एम.डी. वर्षा सतपाळकर, या पालघर निवासी असुन यांचे कडुन  एका आमदाराने ६८ कोटी रुपयाची खंडणी घेतलेली आहे व या खंडणीच्या पैशातून विविध जमिनी खरेदी केलेल्या आहेत याबद्दल याबाबत त्या आमदाराला आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर या कार्यालयातून नोटीस सुध्दा बजाविण्यात आलेल्या आहेत व हि नोटीस त्या आमदाराला बजाविल्यामुळे राज्य सरकार कडुन  आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांवर दडपण सुध्दा आणल्या जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी संथ गतीने सुरू असून या प्रकरणी चौकशी निःपक्षपातीपणे करण्यास अडचण निर्माण झालेली आहे. याबाबत चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सन २००७ ते २०१७ या दशकात विविध चिटफंड कंपन्यांमार्फत युवा-युवती, माता-भगीनी, जेष्ठ नागरीक व ग्रामिण भागातील शेतकरी, छोटे मोठे व्यापारी यांची जवळपास ५० हजार कोटी रुपयाची फसवणूक झाली आहे तसेच या विविध चिटफंड कंपन्यांच्या एजेंटनी खेडेगावातील छोटे मोठे व्यापारी, शेतकरी यांच्या कडुन लहान रक्कमा घेवून त्यांची सुध्दा फसवणुक केलेली आहे. त्यामुळे या विविध चिटफंड कंपन्यांने केलेल्या चिटफंडातील घोटाळ्या प्रकरणामुळे अनेक युवा, युवती, माता, भगीनी, जेष्ठ नागरीक, लहान व्यापारी, शेतकरी यांची फसवणुक झालेली असुन ते रस्त्यावर आलेले असुन त्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहेत.त्यामुळे या घटनाबाह्य राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांकरीता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्याच्या होवू घातलेल्या निवडणुकांच्या तोंडावर राबविण्याच्या बेत आखून राज्यातील माता भगिनीचा मतदानाचा ओघ आपल्याकडे ओढण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने यूवा युवती माता भगीनी जेष्ठ नागरीक व ग्रामिण भागातील शेतकरी, छोटे मोठे व्यापारी यांच्या आयुष्यातील खरी कमाई विविध चिटफंड कंपन्यांच्या फसवणुकीमुळे अडकुन पडलेली आहे व चंद्रपूर जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे ५५० कोटी प्रलंबीत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सुध्दा आर्थिक गुन्हे शाखेकडे जवळपास ५० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे या राज्य सरकारने या प्रकरणाकडे लक्ष वेधुन महाराष्ट्रातील तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील युवा, युक्ती, माता, भगीनी, जेष्ठ नागरीक, व ग्रामिण भागातील शेतकरी, छोटे मोठे व्यापारी यांचा चिटफंड कंपन्यांनी घोटाळा करुन लुटलेला पैसा चिटफंड कंपन्यांकडुन परत देण्याकरीता तात्काळ उपाययोजना कराव्यात तथा आर्थिक गुन्हे शाखेकडे असेलेली चिटफंड घोटाळ्याची प्रकरणे निकाली काढावी जेनेकरुन सामान्य नागरीकांना त्यांच्या हक्काचा पैसा परत मिळेल, असे रविंद्र शिंदे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.सदर प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधुन युवा-युवती, माता, भगीनी, जेष्ठ नागरीकांनी व ग्रामिण भागातील शेतकरी, छोटे मोठे व्यापारी यांनी चिटफंड कंपन्यांमध्ये गमाविलेल्या पैसा परत मिळण्याकरीता सहकार्य करावे, चिटफंड कंपन्यावर कारवाई करून पैसे परत करण्यात यावे, अशी विनंती या पत्रातून शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे कडे केली आहे.सदर तक्रारीच्या प्रतीलीपी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब, पूर्व विदर्भ संपर्क नेते आ. भास्करजी जाधव यांना देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...