Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *सास्ती गावाचे पुनर्वसन...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा* *सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा*    *सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा*

 

सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे निवेदनाद्वारे मागणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- राजुरा तालुक्यातील सास्ती गावाची लोकसंख्या सुमारे ६००० च्या वर असून गाव परिसरात मुबलक प्रमाणात कोळसा असल्याने इथे गावाच्या सभोवताल वेकोलिने खाणीचे साम्राज्य उभे केले आहे. या खाणीचा अनेक बाबतीत गावक-यांना भयंकर त्रास होत आहे. वेकोलिने सन २०१५ पासून गावाचे पुनर्वसनाचे स्वप्न गावकऱ्यांना दाखवले परंतु आजपावतो पुर्नवसनाचे भिजत घोंगडे ठेवल्याने गावकऱ्यांन्या नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. इतक्या दीर्घ कालावधीत गावाचे पुनर्वसन होणे गरजेचे असताना वेकोलीने ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या आवाहनाला भिक सुद्धा घालताना दिसत नाही. त्यामुळे चंद्रपूर १३ लोकसभा मतदार संघाच्या खासदार म्हणून आपण वेकोली बल्लारपूर यास निर्देश देऊन तसेच वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून लवकरात लवकर सास्तीचे पुनर्वसन करावे. तसेच वेकोलिच्या कोळसा खाणी अगदी गावाच्या बाजूलाच आणल्याने त्या खाणीतील तीव्र ब्लास्टिंग मुळे गावातील अनेक नागरिकांचे घरांचे, छतांचे प्लास्टर पडले, सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही परंतु गावातील लोक आता जीव मुठीत धरून जगत आहेत. तसेच गावाचे अगदी बाजूलाच कोळशाची साठवण करणे वेकोलिने सुरु केल्याने उडणाऱ्या धूळ कणांनी व जळत असलेल्या कोळश्यामुळे लोक विविध आजाराने त्रस्त आहेत. तसेच येथील उर्वरित शेत जमीन बाबत लवकरात लवकर बैठक बोलावून मोबदला व नोकरी देण्यात यावी, येथील मट्टी कंपनी व्दारे कोळसा उत्खनन करण्यात येत आहे त्यात स्थानिक बेरोजगारांना न घेता परप्रांतीय कामगारांना घेत असल्याने युवक व ग्रामस्थांमध्ये वेकोली विरोधात तीव्र असंतोष आहे. सास्ती गाव वेकोलीच्या दत्तक गाव असूनही सी एस आर फंडातून गावाच्या विकासासाठी कोणताही निधी उपलब्ध होत नाही. वेकोलीने २ वर्षापासून ग्रामपंचायत मालमत्ता कर थकविला आहे. यामुळे वरील सर्व समस्या सोडविण्यासाठी वेकोली बल्लारपूर प्रशासनावर दबाव आणून समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी सास्ती येथील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी खासदार श्रीमती प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांची विश्रामगृह राजुरा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.या प्रसंगी आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सास्ती ग्रा. प. सदस्य मधुकर झाडे, शिवसेनेचे विलास भटारकर, काँग्रेसचे मिथिलेश रामटेके, सुनिता माऊलीकर, राजश्री राजूरकर, सचिन नळे, नदीम शेख, नंदकिशोर चन्ने, प्रभाकर नळे, बाळू रोगे, मारोती माऊलीकर, आकाश माऊलीकर, दिवाकर झाडे, संतोष चन्ने, संदीप लोहबडे, संतोष गोनेलवार, दिनेश काळे, बंडू उपरे, रमेश कुंदलवार, सुधाकर खनके यासह सास्ती गावचे नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ. 05 October, 2024

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश. 05 October, 2024

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या. 05 October, 2024

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा*    *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा* *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी*

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक,...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न. 05 October, 2024

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

राजुरातील बातम्या

*महाराजांचे आदर्श बाळगणाऱ्या तरुणांचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *धोपटाळा ते रायगड धावत जाणाऱ्या युवकांचा केला सन्मान*

*महाराजांचे आदर्श बाळगणाऱ्या तरुणांचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *धोपटाळा ते रायगड धावत जाणाऱ्या युवकांचा केला...

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले*

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू...