Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *सेवानिवृत्तांनी समज...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे*    *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे*

 

खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी :-खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळ, गोंडपिपरी द्वारा खैरे कुणबी समाज भवन गोंडपिपरी येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा तया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य सुनील शेरकी आणि नांदगाव चे सरपंच हिमाणी वाकूळकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थी आणि कर्तव्यरत किंवा सेवानिवृत्त कर्मचारी हे समाजाचे भुषण असतात. गुणवंत विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रमातुन जीवन ध्येय गाठण्यात यशस्वी व्हावे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी समाजातील तळागाळातल्या समज बांधवांच्या उन्नतीसाठी आपल्या अनुभवाचा उपयोग करावा असे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ. विजयराव देवतळे, विशेष अतिथी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, गोंडपिपरी कृ. उ. बा. स. सभापती इंद्रपाल धुडसे, स्वागताध्यक्ष सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बट्टे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, प्रमुख पाहुणे माजी सभापती दिपक सातपुते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, पोंभुर्णा तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव पाल, व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष गणपत चौधरी, कृ. उ. बा. स. संचालक अशोक रेचनकर, महिला बालकल्याण सभापती वनिताताई वाघाडे, आरोग्य व बांधकाम सभापती रंजनाताई रामविरकर, नगरसेवक अनिल झाडे, खैरे कुणबी समाज मंडळ चे तालुकाध्यक्ष नामदेव सांगडे, माजी अध्यक्ष संजय झाडे, जिल्हाध्यक्ष दिनकर ठोंबरे यासह खैरे कुणबी समाज मंडळ चे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खैरे कुणबी समाज मंडळ चे अरूण झगडकर, आकाश झाडे, सुनील कोहपरे, किशोर भोयर, कोरडे, पाल, विजय बट्टे यासह खैरे कुणबी समाज मंडळाच्या सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...