Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *निवडणूकांसाठी अर्थसंकल्पात...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*निवडणूकांसाठी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस..सर्वसामान्यांच्या पदरी घोर निराशा : आमदार सुभाष धोटे*

*निवडणूकांसाठी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस..सर्वसामान्यांच्या पदरी घोर निराशा : आमदार सुभाष धोटे*

*निवडणूकांसाठी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस..सर्वसामान्यांच्या पदरी घोर निराशा : आमदार सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

  राजुरा

 

राजुरा :-महाराष्ट्र राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात सरकारने येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला मात्र यातून सर्व सामान्य माणसाच्या पदरी घोर निराशाच पडली आहे. राज्यावर ७ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जाचे डोंगर उभे असतांना या आधी च्या घोषणा पुर्ण केले नसतांना आता या नवीन अवाढव्य आणि जवळजवळ फसव्या घोषणा हे सरकार कसे काय पुर्ण करणार आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार युवक, महिला, नोकरदार वर्ग, व्यापारी, उद्योजक या सर्वच घटकांना केवळ स्वप्नांचे गाजर दाखविण्यात आले आहेत. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतमालांचे कोसळलेले भाव, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पिकविम्याच्या थकलेल्या रक्कमा, कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था, निधी अभावी तसेच जल जीवन अंतर्गत खराब अवस्थेतील रस्ते, राज्यात निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, अर्धवट असलेले घरकुल, निराधारांचे अनुदान, खुंटलेला औद्योगिक विकास, महाराष्ट्राबाहेर जाणारे प्रकल्प यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर कुठलेही ठोस आणि धोरणात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. सरकार च्या दुर्लक्षामुळे महावितरण ने विज जोडण्या न जोडल्याने अनेक शेतकरी टाहो फोडत आहेत. नियमित विज बिल भरूनही वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने राज्य सरकार व महावितरण वर नागरिकांचा प्रचंड रोष आहे मात्र याबाबत कोणतेही स्पष्ट धोरण व तरतूद यात नाही. आनलाईन नोकरभरतीत मोठय़ा प्रमाणात अनियमितता आणि गोंधळ पहायला मिळत आहे त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये या सरकार विरोधात तिव्र असंतोष आहे. जनता आता या महायुती सरकार च्या फसव्या घोषणांना काही केल्या बळी पडणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत यांना धडा शिकविल्या शिवाय शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*    *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* 02 July, 2024

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर*

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* ✍️रमेश...

शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. 02 July, 2024

शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

वणी प्रतिनिधी: विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज, राज्याचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा...

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 01 July, 2024

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:...

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन* 01 July, 2024

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन*

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-स्व.पारसमल...

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* 30 June, 2024

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना*

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-अंगणवाडी सेविका मदतनीस यांना...

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे*    *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार* 30 June, 2024

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या...

राजुरातील बातम्या

*लाखो लिटर पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीवर कारवाई करा : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*लाखो लिटर पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीवर कारवाई करा : आमदार सुभाष धोटेंची मागणी* ✍️दिनेश...

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...