Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अखेर ग्रामस्थानी जि...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले परत*

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले  परत*

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले  परत*

 

  ✍️दिनेशश झाडे

 

कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपुर महामार्गाच्या कामाकरिता कंत्राटदार कंपनी जीआरआयएल हे अनेक उत्खननाच्या वादात चर्चेत असताना कंपनीची प्रशासनाचे वचक नसल्यामुळे बेफाम दिसेल त्या ठिकाणी दगड माती मुरूम उत्खननाचा सपाटा या भागात सुरू केला याबाबत जिल्हा प्रशासन खाली कर्म विभाग यांच्याकडे अनेक तक्रारी असून सुद्धा तालुकास्तरीय महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने यापूर्वी या भागात झालेल्या अवैध उत्खननाच्या बाबतीत दिनांक ८ मार्च २०२४ ला रात्री एक वाजता देवघाट येथे पोकलेन मशीन व हायवा वाहनाने अवैद्य उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे तक्रारीवरून मौक्यावर उत्खनन स्थळाला पाहणी करूण वाहन तहसिलदार व्हटकर ठानेदार एकाडे यांनी ताब्यात घेऊन तहसिल कार्यालयात जमा करूण सकाळी सोडून दिले दि २० जुन रोजी परवानगी नसताना उत्खनन वाहण वाहतूक गावकऱ्यांनी थांबवित पोलीसाना पाचारण केले रात्रौ ११ वाजता वाहन मौक्यावर कोरपना पोलीस पोहचले व वाहन क्र एम एच ४८,  ४४६९ एम एच ४८ , ६११४  बि आर  ६४४७ एम एच ४८ , ६१२ ८ हे वाहन ताब्यात घेऊन पोलीसात जमा केले व महसुल विभाग कार्यवाही करेल म्हणून पत्र देऊन कळविले मात्र तहसिलदार कोरपना यांनी रात्र उत्खनन करण्यासाठी कोणत्या विभागाने परवानगी दिली व कोणत्या आधारे वाहन सोडण्याचा आदेश दिला हे कळण्यापूर्वी दि २१ जुन ला ४ही हायवा वाहन कंपनीच्या स्वाधिन केले  जि आर आय एल कंपनीने  मुजोरी व नियम बाह्य या पूर्वी २०२३ मध्ये नाल्याची मंजुरी घेऊन पाटबंधारे विभागाच्या सांडतव्याचे उत्खनन करूण पाणी नियंत्रण गतीरोधक वॉल तोडफोड करूण नुकसान केल्याचा अहवाल व प्रत्यक्ष कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करूण झालेल्या नुकसानी संबंधाने जि आर आय कंपनीचे अवैध उत्खनन बंद करूण झालेल्या नुकसानी ला कंपनीला नोटीस देऊन जबाबदार पकडले मात्र कंपनीने वाल बांधकाम करण्यात येईल अशी हमी देऊन कार्यवाही टाळली मात्र उन्हाळभर गतीरोधक भिंती उभ्या न करता पावसाच्या हंगामात काम सुरु केले मात्र कालव्याचा विसर्ग झाल्यास नात्या काठावरील शेतीचे व गावाना धोका निर्माण झाला आहे कंपनीला उत्खनन करण्यास  बंद करून सुद्धा कंपनीने मे जून महिन्यात नियम बाहय उत्खनन करूण ठिक ठिकाणी खड्डे खोल केल्याचे दि २३ जून ला शाखा अभियंता यांच्या निदर्शनास आले वरिष्ठ अधिकारी यांना व्हीडीओ द्वारे सर्व चित्रीकरण दाखविले संभाव्य धोका व पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता शासकीय मालमत्तेला हानी व तांत्रीक दुष्टया अयोग्य पद्धतीने उत्खनन दिसून आल्याने कंपनी विरोध कार्यवाही करण्याची तक्रार पोलीस स्टेशन कोरपना यांचे कडे दिली मात्र पोलीसा कडून अजुन चौकशीचे चक्र फिरले नसल्याने नागरीकाचे लक्ष कार्यवाही कडे लागले आहे दि ५ जानेवारी २०२३ ते १८ एप्रील पर्यंत राजुरा / कोरपना तालुक्यातील २५ तलाव व नात्याचे दगड मुरूम मातीची परवानगी जिल्हाधिकारी यांचे कडून घेण्यात आले मात्र १ ते २३ अटीचे पालन कंपनीने केलेले नाही बोगस सिमांकन चुकीचे पंचनामे जलसंधारण विभागाचे उपयोगीता पत्र संशयास्पद आहे आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील जल जंगल जमीनीवर ग्रामसभेचा अधिकार असताना ग्रामसभेला डावलून परवानगी घेत अवैध उत्खनन करूण १ ते २३ अटी शर्ती भंग केल्याने शासनाच्या स्वामीत्व धनाला चूना लावल्या जात आहे या भागातील ग्रामीण अनेक रस्ते पावसापूर्वीच नासधूस व खड्डेमय झाले टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने निर्माण केलेले सिमेंट बंधारे नास घुस करूण वाहन जाण्याचे रस्ते तयार करण्यात आले नागरीकाच्या समस्या सोडविण्या कडे दुर्लक्ष होत असल्याने कुसळ येथिल गावकऱ्यांनी दि २४ जून च्या रात्रो वाहन अडविले व खराब रस्त्यावर ४ गाडी रेती दगड खाली करूण वाहन बंद पाडले मात्र पुन्हा मुजोरीने दि २५ ला सकाळी विना परवानगी कुसळ नात्यावर पोकलेन द्वारे उत्खनन सुरू असताना गावकऱ्यानी नात्यावरून खड्डयातून शेतीत जायचे कसे 3 ते ४ मीटर उतखनन तात्काळ थांबवित वाहन परत केले गावकऱ्यानी कंपनीचे प्रतिनिधि व प्रशासन अधिकारी मौक्यावर आल्याशिवाय खोदकाम होऊ देणार नाही अशी भुमीका घेतली यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली मोहपत तोडासे दौलत तोडासे अकबर आत्राम वैभव किन्नाके बाबाराव सिडाम रामदास पोराते शतुधन पोराते सुनिल किन्नाके यांचे सह अनेक गावकरी उपस्थित होते या ठिकाणी असलेले वाहन अखेर गावकऱ्यानी परत पाठविले या भागातील रस्त्याची दैना व्यस्था झाल्याने नागरीकात रोष निर्माण झाला आहे कंपनी स्वताःच्या फायदयासाठी नियम बाह्य उत्खनन बंधाऱ्याची तोडफोड रस्त्याची दुरवस्था निर्माण करीत अवैद्य उत्खनन करून स्वामित्वधनाचे नुकसान केल्याचा आरोप नागरीकानी केला आहे

ताज्या बातम्या

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन. 28 September, 2024

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन.

वणी:- लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२४ 'मानवता सेवा सप्ताह' अंतर्गत...

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

कोरपनातील बातम्या

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...