Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-चंद्रपूर जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यांसह राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या तालुक्यात मोठया प्रमाणात इतर मागासवर्गीय नागरिक कुटुंबांसह वास्तव्यास असून यातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अंत्यत हलाकीची आहे. अशा नागरिकांना शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शबरी आवास योजना, अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजनेंतर्गत तसेच इतर योजनेतून घरकुल मंजूर करून दिलेत. मात्र शासनाकडून घरकुल बांधकाम करण्यासाठी मिळणारे अनुदान पहिलेच तुटपुंजे असताना लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणारे हप्ते मिळत नसल्याचे निदर्शनास आले. विविध योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे घरकुल बांधकामाचे हप्ते कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहेत याकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.शासन प्रशासनाच्या अनास्थेमुळे अनेक लाभार्थ्यांचे घरकुलांचे बांधकाम अर्धवट असून बांधकाम साहित्य घेण्यासाठी आर्थिक अडचन निर्माण होत आहे. घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांला बचत गट किंवा पतसंस्थेतून कर्ज घ्यावे लागत आहे. अनेक घरकुल लाभार्थ्यांच्या घराची कामे पूर्णत्वास येत आहेत. मात्र लाभार्थ्यांना अजूनही घरकुल बांधकामाची रक्कम मिळालेली नाही. अनेकांनी शेतीमधुन थोडेफार होनाऱ्यां उत्पनाच्या किंवा उसनवारीच्या माध्यमातून घराची कामे पूर्ण केलेली आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना सध्यास्थितीत शासनाकडून मिळणाऱ्या लाभाची अत्यंत आवश्यकता आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे घरकुल बांधकामाचे हप्ते तातडीने त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा मुख्य कार्यपालन अधिकारी, जि. प चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन. 28 September, 2024

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन.

वणी:- लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२४ 'मानवता सेवा सप्ताह' अंतर्गत...

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

राजुरातील बातम्या

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले*

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू...

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा* ✍️दिनेश...