Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस लोखंडी पुलाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

काँग्रेस पदाधिकारी यांची संयुक्त चौकशीत तोडगा निघाला.

घुग्घुस -  वस्ती व वेकोली (WCL,)  कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे गंजले असल्याने रेल्वे विभागाने हा पूल धोकादायक असल्याचे लक्षात घेवून एक महिन्यांपूर्वी बंद केला

राजीव रतन रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाणपुलाच्या निर्माण कार्यामुळे याठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी निर्माण होते.

यामुळे लोखंडी पूल सुरू असणे  शहरातील नागरिकांना अत्यंत आवश्यक असल्याने हा शुरु करावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, काँग्रेस नेते सैय्यद अनवर व पदाधिकाऱ्यांनी केली व सतत पाठपुरावा केला तसेच नागरी सत्कार कार्यक्रमा करीता शहरात आलेले खासदार प्रतिभाताई धानोरकर तसेच आमदार सुभाष भाऊ धोटे यांना ही व्यापारी मंडळाने लोखंडी पूल शुरु करण्यासाठी निवेदन दिले होते

त्या अनुषंगाने आज दिनांक 21 जून रोजी रेल्वे विभागाचे अधिकारी ए,डी,एम सुबोध कुमार,आय,ओ, डब्ल्यू राजूरकर         वेकोलीचे सब एरिया सुधाकर रेड्डी व काँग्रेस पदाधिकारी यांनी संयुक्तपणे पुलाची पाहणी केली

रेल्वे अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या दुरुस्तीला लागणाऱ्या रकमेचा अंदाज पत्रक (इस्टिमेंट) तातळीने वेकोली अधिकाऱ्यांना देतील व वेकोली अधिकारी तातळीने ही रक्कम मंजूर करून दुरुस्ती कार्याला सुरुवात करतील असा संयुक्तपणे निर्णय घेण्यात आला सदर दुरुस्ती नंतर या पुलाचे आयुष्यमान पंधरा ते वीस वर्षांनी वाढेल असा आशावाद रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला

याप्रसंगी काँग्रेस नेते अलीम शेख, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,नुरुल सिद्दीकी,हरीश कांबळे व अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

घुग्गुसतील बातम्या

आर्थिक उन्नती आणि नवीन रोजगार निर्मिती करून लॉयड्स मेटल्सने केला घुग्गुसचा काया पालट.

लॉयड्स मेटल्स आता त्यांच्या नवीन विस्तार योजनांमध्ये लक्षणीय प्रगती करत आहे. या प्रगती मुळे केवळ त्यांची आर्थिक उन्नती...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...