Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *नोंदणी निबंधक कोरपना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक*

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक*

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक*

 

   ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

कोरपना:-कोरपना तालुक्यातील औद्योगिकरणाच्या विकासाच्या नावावर जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या जोमात सुरू आहे या संधीचा फायदा घेत दलालाचां सुळसुळाट सर्वीकडे दिसून येत आहे परसोडा येथील सिमेंट उद्योगाच्या जमीन खरेदीमध्ये अनेक जणांनी आपले हात पिवळे केले आहे मातीमोल भावाने जमिनी खरेदी करून नंतर त्या जमिनी कंपन्याच्या घशात टाकण्यात आले कोरपणा येथे व परिसरामध्ये अकृषक लेआऊट असलेला प्लॉट तसेचखरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या जोमात सुरू आहे काही दलालांनी थेट शेतकऱ्याची एक भाव ठरवून व्यापाऱ्याला दुसरे भाव ठरवून लाखो रुपयाची दलाली घेतल्या जात असल्याचे चर्चा या भागात जोरात सुरू आहे या भागातील काही दलाल व अर्जनविसयांचे मधुर संबंध असल्यामुळे शेतकऱ्यांना घेऊन वर्ग दोनची जमीन वर्ग एक करून देतो थांब घेऊन येतो आपल्याला कागदपत्र करावे लागतात यासाठी शासनाकडून मंजुरी घ्यावे लागते असे अनेक कारणं सांगून शेतकऱ्याला हतबल करतात व यासंधीचा फायदा दलाल लोकांनीमोठ्या प्रमाणात घेत असून कोरपणा येथील तहसील कार्यालय सुद्धा दलालांच्या तावडीतून सुटलेला नाही अनेक बोगस संजय गांधी निराधार योजनेचे केसेस तयार केल्या जातात ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न  जास्त आहेअशा अनेक लोकांना अनुदानाचा लाभ दिल्या जात आहे गरीब मात्र आजही आपल्या हक्काच्या अनुदानापासून वंचित आहे तहसील कार्यालयातील अनेक दलालांच्या सुळसुळाटामुळे सामान्य नागरिक हतबल झाली असून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्या जात आहे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सहाय्यक नोंदणी निबंधक कार्यालयव तहसील कार्यालयातील दलालाचा वावर कमी करावा व शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे याबाबत काही सामाजिक संघटना पुढे सरसावले असून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चिरीमिरीचे अनेक प्रकरण गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे प्रलंबित आहे तर अनेक लोक लाच लुपतप्रतिबंधक विभागाकडे संपर्क न करता वेळ व पैशाची नासाडी होऊ नये म्हणून चिरीमिरी देऊन कामे उरकून घेण्यात धन्यता मानतात यामध्ये दलालांचा सक्रिय सहभाग आहे या जिल्ह्यामध्ये अनेक तलाठी ग्रामसेवक दारूबंदी पोलीस विभाग तहसील विभाग बांधकाम विभाग अशा अनेक विभागात दलालांचा वावर वाढला असून प्रशासनाचा वचक भ्रष्ट अधिकाऱ्यावर राहिलेला नाही यामुळे अनेकअधिकारी कर्मचारी लाच लचपत प्रतिबंधक कायद्यात अडकून सुद्धा अधिकाऱ्यावर कोणता परिणाम झाल्याचा दिसत नाही यामुळे आता या भ्रष्टाचाराची चीड जनसामान्यमध्ये निर्माण होत असूनयाला आवर धरण्याचा आंदोलनच आता जनता हाती घेईल असे चित्र निर्माण झाले आहे

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...