Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आ. सुभाष धोटे अ‍ॅक्शन...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आ. सुभाष धोटे अ‍ॅक्शन मोडवर : जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश*

*आ. सुभाष धोटे अ‍ॅक्शन मोडवर : जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश*

*आ. सुभाष धोटे अ‍ॅक्शन मोडवर : जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- राजुरा तालुक्यातील विविध विभागांमध्ये प्रलंबित असलेल्या जनतेच्या समस्या आणि प्रगतीपथावर असलेल्या निर्माण कामांबाबत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात आढावा सभा घेऊन जनतेशी संबंधित समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.यामध्ये राजुरा तालुक्यातील अतिवृष्टी व खरवडून झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान, पिकविम्याच्या थकलेल्या रक्कमा, वन्य प्राण्यांमुळे झालेले नुकसान, चिंचोली येथील चक्रीवादळाने झालेले नुकसान, ३३३ बटे २ ची मोजनी, कृषी पंपांची विज जोडणी, पांदन रस्त्यांची अर्धवट कामे पूर्ण करणे, शहरी व ग्रामीण भागातील घरकुल पुर्ण करणे, रोजगार हमी, मनरेगा ची कामे सुव्यवस्थेतपणे करणे, वेकोली प्रभावीत गावांमध्ये थाईराईडयुक्त पाणी पुरवठाबाबत प्रभावी उपाययोजना करणे, नागरिक आरोग्याच्या दृष्टीने नाली, गटारे सफाई, धूर फवारणी करणे, जल जीवन ची कामे पूर्ण करून गावागावांत फोडलेले रस्ते अध्ययावत करणे, भ्रष्टाचाराची चौकशी करणे, शुध्द पाणी पुरवठा करणे, रॅशन कार्ड तातडीने वाटप करून अन्नपूरवठा यंत्रणा सुव्यवस्थित करणे, चढ्या भावाने व बोगस बियाण्यांची होणाऱ्या विक्रीवर आळा घालणे, वारंवार खंडित होणारा विज पुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरू ठेवणे इत्यादी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन त्या तातडीने सोडविण्याचे निर्धेश आ. सुभाष धोटे यांनी अधिकाऱ्यांना दिले.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, प्रभारी तहसीलदार डोणगावकर, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, बांधकाम अभियंता खापणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, साईनाथ बतकमवार, माजी नगरसेवक आनंद दासरी, संचालक संतोष इंदूरवार, अँड. रामभाऊ देवईकर, धनराज चिंचोलकर, इरशाद शेख, प्रा. प्रफुल्ल शेंडे, चेतन जयपूरकर, मारोती मोरे, संजय कुडमेथे यासह कृषी, पंचायत, विद्युत, आरोग्य, पोलीस, वन, अन्न पुरवठा, महसूल, नगर परिषद यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

राजुरातील बातम्या

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले*

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू...

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा* ✍️दिनेश...