Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *चोरी चोरी ,, चुपके चुपके...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*चोरी चोरी ,, चुपके चुपके वनक्षेत्रात जि आर आय एल कपंनी उत्खनन जोरात ?* *वनक्षेत्रात अवैध उत्खनन*

*चोरी चोरी ,, चुपके चुपके वनक्षेत्रात जि आर आय एल कपंनी उत्खनन जोरात ?*    *वनक्षेत्रात अवैध उत्खनन*

*चोरी चोरी ,, चुपके चुपके वनक्षेत्रात जि आर आय एल कपंनी उत्खनन जोरात ?*

 

वनक्षेत्रात अवैध उत्खनन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी या रस्ते विकास कामाच्या काम जोरात सुरू असून जी आर आय एल या कंपनीच्या माध्यमातून काम सुरू आहे मात्र गेल्या तब्बल १७महिन्यात कंपनीने खणीकर्म विभाग जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फतीने बारवाही वाहणारे नाले तसेच मामा तलाव व शासकीय जमिनीवरील उत्खननाचे परवानगी घेतल्याचेदाखवून जिल्हाधिकारी यांनी टाकून दिलेल्या अटी शर्ती तिलांजली देत या कंपनीने मंजूर क्षमतेपेक्षाही अधिक प्रमाणामध्ये दगड मुरूम रेती माती उत्खनन केली याबाबतच्या कंपनीच्या मुजोरी व नियमबाह्य कामाबाबत तहसीलदार कोरपणा यांच्याकडे दोन वेळा कारवाई करून वाहन ताब्यात घेण्यात आले होते जिल्हाधिकारी यांनी रेती उत्खनन करू नये तसेच अटी व शर्तीचे पालन करावे असे नमूद करून उत्खनन आदेश दिले मात्र प्रत्यक्षात या कंपनीने अटी शर्ती भंग करून २४तास उत्खनन करीत आहे अटीमध्ये असलेल्या शर्ती मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन झाल्यास स्वामित्व धन जमा करण्याची तरतूद आहे मात्र गेल्या दोन वर्षात या कंपनीने अतिरिक्त उत्खननाचा एक नवीन पैसा शासनाच्या तिजोरीमध्ये जमा केला नाही मात्र काही लोकांचे खिसे गरम करून शासनाच्या स्वामित्व धनाला चुना लावल्या जात आहे अनेक नाले शासकीय कागदपत्रात कुठेही हेटी येथे तलाव निमणी येथे तलावनसताना शासनाच्या गायरान जमिनीवर मुरुमाचे उत्खनन करण्यात आले सदर तक्रार होताच या ठिकाणावरून उत्खनन बंद करून नाल्याकडे आपला ओढा कंपनीने नेला राज्यामध्ये रेती उत्खननाबाबत वेगळे नियम असून मुठरा नाल्यातीलइमारतीला वापर योग्य अशा रीतीचा वापर हरदोना चंदनवाही पांढरपौणीया भागात मोठ्या प्रमाणात वापर झाला अनेक तक्रारी खनि कर्म विभाग जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन यांच्याकडे असताना मात्र डोळे झाक केल्या जात आहे संपूर्ण नाले पोखरून काढत असताना जिल्हाधिकारी यांची कोणती रितसर परवानगी नसताना कोरपणा तालुक्यातील बोरगाव बुद्रुक नाल्यावरील तसेच टागारा कमलापूर शिवारातील वनक्षेत्रातील नाल्याची उत्खननाची परवानगी नसताना वन क्षेत्रामध्ये उत्खनन झाले कसे व या उत्खननाची परवानगी कंपनीने कोणत्या विभागाकडून घेतली याबाबत जनतेमध्ये शंका निर्माण झाली असून कंपनी जिल्हा आदेशाला केराची टोपली दाखवीत रात्रच्या अंधारामध्ये पोकलेन जेसीपी व हायवा वाहनाद्वारे उत्खनन करून वापर करीत आहे असे असताना मात्र प्रशासनाची भूमिका बघ्याची झाली असून वन विभाग एका शेतकऱ्याच्या काठीला जप्त करून कारवाई करणारालाखो ब्रास मुरूम उत्खनन करून वाहतूक होत असताना अनभिज्ञ कसारस्त्यावरून वाहतूक होत असताना वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन करीत ताडपत्री न झाकता ओवरलोड वाहतूक अविरत या भागात सुरू आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयातील तरतुदी या कंपनीने पालन केलेले नाही तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशातील १ ते २२अटी या कंपनीने भंगकेले आहेप्रत्यक्षात राजुराते गोविंदपुर या रस्त्यावर २४नाल्यातून उत्खनन करण्यात आलेल्या मुरूम दगड माती याचे पंचनामे सर्व बोगस व बनावटी असून कुठलेही सीमांकन करून मोजमाप उत्खननाचे परिसर नियमाप्रमाणे निश्चित केलेली नाही त्यामुळे जलसंधारण उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले उपयोगिता प्रमाणपत्र देखील बेबनाव व ऑफिसमध्ये बसून करण्यात आलेले आहे ज्या अधिकाऱ्यांनी मौका पंचनामा नियमानुसार करण्यात आलेला नाही कोणत्याही पंचनामांमध्ये लांबी रुंदी स्थळ व त्या परिसरातील दिशेला असलेली माहिती नमूद केलेली नाही त्यामुळे पैनगंगा नदीवरून पकडे गटन जलाशयाच्या सांडव्यापर्यंत लाखो ब्रास नियमबाह्य या कंपनीने उत्खन केलेला आहे यापूर्वी याबाबत अनेक तक्रारी रस्ते विकास प्राधिकरण खली कर्म विभाग यांच्याकडे प्रलंबित असून एकही चौकशी झालेली नाही कुंपणच शेत खात असल्यामुळे नागरिकांनी अपेक्षा तरी कोणाकडून करावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे कुसळ या ठिकाणी पूनम कुमार हे कंपनीचे संपर्क अधिकारी म्हणून काम पाहतात कुसळ येथील नाला नियमबाह्य उत्खनन करून पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी उत्खनन केलेले दगड मुरूम ढिगारे उभे केले आहे तर या गावात गावकऱ्यांना पायाभूत सुविधा अंतर्गत बंधाऱ्याची दुरुस्ती करून देण्यात येईल असे गोड गोड बोलून लाखो ब्रास कुसळ शिवारातील गौण खनिज या कंपनीने उत्खनन केलं आहे मात्र पाऊस काळा तोंडावर आला असून कंपनीने नाल्यातील ढिगारे उचल केलेले नाही बंधारे दुरुस्त केले नाही यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून जिल्हा प्रशासन राष्ट्रीय महामार्गाच्या वापर करण्यात आलेल्या दगड मुरूम माती मूल्यांकनानुसार अतिरिक्त उत्खननाचा स्वामित्व धन वसूल करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे कंपनीने राजुरा कोरपणा तालुक्यातील अनेक नाल्यातून मंजुरी पेक्षा चार पट अधिक मुरूम दगडाचा वापर केले आहे पायाभूत सुविधा करून देण्याच्या नावावर नाल्याच्या गावाच्या लोकांना खोटे आश्वासने देऊन एकही काम न करता अविरत उत्खनन सुरू आहे याबाबतची चौकशी करून राष्ट्रीय संपत्तीची होणारी नुकसान जिल्हा प्रशासन थांबवणार का असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

कोरपनातील बातम्या

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...

*कोरपना तालुक्यातील अवैध देशी दारूची सऱ्यास विक्री कुणाच्या आशीर्वादाने?* *अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन करणार मंगेश तिखट यांचा इशारा*

*कोरपना तालुक्यातील अवैध देशी दारूची सऱ्यास विक्री कुणाच्या आशीर्वादाने?* *अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन...