Home / चंद्रपूर - जिल्हा / राष्ट्रीय मागासवर्गीय...

चंद्रपूर - जिल्हा

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे प्रतिपादन

ओबीसी समाज राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या पाठीशी : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : यापुढे ओबीसी आरक्षणाबाबत कोणतेही घोटाळे होणार नाही. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा प्रभाव व दबाव आता वाढलेला आहे. आयोग ओबीसीबाबत होणाऱ्या सर्व घोटाळ्यावर अंकुश ठेवून आहे. तसे अहवाल तयार करण्यात येत आहेत. शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती पासून तर नोकर भरती इथपर्यंत आता आयोग लक्ष ठेवून आहे. काही राज्यात होणारे घोटाळे आयोगाने उघडकीस आणले आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल, अशी ग्वाही भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी यावेळी आयोजित संवाद कार्यक्रमात दिली.

पं. बंगाल, कर्नाटक व इतर राज्यांनी ओबीसी आरक्षणात केलेले घोटाळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून उघड झाले आहे. त्यासंबंधी ओबीसी संघटनांसोबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा ओबीसी संवाद कार्यक्रम आज (दि.१) ला स्थानिक जनता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मधे पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानी डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित होते.

मंचावर प्रमुख अतिथी स्वरूपात ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव फंड, बबनराव वानखेडे, ज्येष्ठ विधीज्ञ पुरुषोत्तम सातपुते, माजी आमदार ऍड. संजय धोटे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे, ओबीसी मोर्चाचे विनोद शेरकी आदी उपस्थित होते.

या ओबीसी संवाद कार्यक्रमात पूर्व विदर्भातून ओबीसीतील विविध जात समुदायातील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संवाद कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरे घेण्यात आली. उपस्थित ओबीसी बांधवांनी हंसराज अहिर यांना प्रश्न विचारली, त्या प्रश्नांची यथोचीत उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्या गेला. या निमित्ताने काही जात संघटनांनी आयोगाच्या अध्यक्षांना निवेदन दिले.

कार्यक्रमाला किसनराव गरपल्लीवार, जयजगन्नाथ जंपलवार, विजुभाऊ मुंगले, भुजंग ढोले, राजू बोलमवार, राहुल देवतळे, वंदना संतोषवार, मुग्धा खांडे, अरुणा चौधरी, सारिका संदुरकर, वासमवार, जनार्दन थेटे, अमोल चवरे, रामकृष्ण मंदावार, अशोक रामगिरवार, विवेक कुटेमाटे, केशव थीपे, शंकर काळे, किशोर मोगरे, निकीलेश चामरे, सुरेश धांडे, शिवदास शेंडे, आयुष वासेकर, प्रेमलाल पारधी, अरुण मालेकर, अरुण देऊलकर, नितीन सोनपितरे, देवराव सोनपितरे, चेतन शेंडे, मधुकर घाटे, एन.बी. सूर, आर.एम. शिखरे, टी.एस. भोयर, रमेश बोबडे, चंद्रशेखर बोबडे, निर्मला हेलवटे, एस.पी. सातपुते, एस. व्ही. मोहितकर, एस. व्ही. अडबाले, पी.बी. जांभूळकर, एस.बी. ठावरी, पी.एम. उरकुडे, एम. एल. पानघाटे, डी.एल. कुबडे, एस.एन. टोंगे, एस. डी. गौरकर, पी. डी. आगलावे, आर.एन. ढोके, डी.एम. बोढे, पी. डब्लू. जेनेकर, पी.बी. भोंगळे, पी.एस. पानघाटे, भास्कर जीवतोडे, बंडू लांडे, विठोबा पोले, अमरसिंग बघेल, नरेंद्र धांडे, पिपरे, ताजने, जोगी आदी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. रविकांत वरारकर यांनी केले.
--------------------------------------

ओबीसीतील घुसखोरी खपवून घेणार नाही : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

धर्मानुसार आरक्षणाला ओबीसी संघटनांचा विरोध

वारंवार ओबीसी संवर्गातून इतर सधन जाती आरक्षण मागत आहेत. देशातील विविध राज्यात राज्य सरकार मतांचे राजकारण करण्यासाठी धर्माच्या आधारावर सधन जातींना घटनाबाह्यरीत्या ओबीसीत सामावून घेत आहेत. हा खूप मोठा घोटाळा आहे. महाराष्ट्रात मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत आहे. पं. बंगाल, कर्नाटक व इतर राज्यात धर्मानुसार आरक्षण दिल्या जात आहे. ओबीसीतील ही अवैध घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, ओबीसीतून आरक्षण देताना त्या जातीचे मागासलेपण तपासून बघितले पाहिजे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यावेळी अध्यक्ष स्थावरून बोलले.

ताज्या बातम्या

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत  23 June, 2024

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत

वणी: काल शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी वाघोबा-खंडोबा देवस्थान वणी येथे सायंकाळी झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी...

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी. 22 June, 2024

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस - वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे...

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* 22 June, 2024

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी*

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-...

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा 22 June, 2024

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

झरी:आंतरराष्ट्रीय योगदिन मार्निंग ग्रुप मुकूटबन यांच्या वतीने २१जूनला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .हाताची...

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा 21 June, 2024

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा

मुकूटबन-झरी तालूक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालय मांगली शाळेत आज दि .२१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा...

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन 21 June, 2024

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन

यवतमाळ:जिल्हा काँग्रेस यवतमाळ च्या वतीने आज दिनांक २१ जुन २०२४ ला सकाळी ११ वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी,दलीत,...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

अंबोरा छोटा नागपुर राखडच्या लोखंडी पाइपलाइनचे गॅस कॅटरच्या साह्याने कापून, लाखो कोट्यावधी रुपयांची चोरी, सिटीपीएस भावना कंपनीचे साटेलोटे तर नाही ना ?

घुग्घुस:- चंद्रपुर -जिल्ह्यातील- पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत, छोटा नागपुर जवळपास रात्रेच्या सुमारास राखडच्या लोखंडी...

घुग्घुस शहरातून संशयास्पद रित्या इसम बेपत्ता, वीस दिवस होऊन देखील काही थांगपत्ता लागेना ?

घुग्घुस : शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरात राहणारे विष्णू भोलानाथ तिवारी वय 48 वर्ष उंची सहा फूट रंग सावळा अंगात लाल रंगाचे...

गोवरी 1 च्या खाणीत भंगार माफियांची टोळी सक्रिय,हजारो टनाच्या लोखंडी साहित्यावर चोरट्यांची मोठी नजर .

चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत गोवरी 1 च्या खाणीत भंगार माफियांची टोळी 15 ते 20 टोळी सक्रिय असून, हजारो...