Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत करा : आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना सुचना*

*दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत करा : आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना सुचना*

*दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत करा : आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना सुचना*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुग, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे फार मोठे नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवळुन गेल्या. याबाबत महसुल विभाग, कुषी विभाग व ग्रामपंचायत सचिव याच्यां मार्फतीने पंचनामे पूर्ण करून तहसिल कार्यालयाकडे अहवाल सादर झाले मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापी नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. शेतकऱ्यांची सन २०२४-२५ मधील पेरणीची सुरूवात होत आहे. सततची नापिकी, दुष्काळ परिस्थिती इत्यादीवर मातकरून शेतकरी विविध पिकांचे उत्पादन घेत असतांना शेतपिकाना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कर्जबाजारीपणाला कंठाळुन अनेक शेतकरी आत्महत्येसारखे विचार मनात आणुन काही शेतकरी आत्महत्या सुध्दा करीत आहेत. पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना दि बियाने खरेदीकरीता अडचण होत असल्याने सन २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडुन नुकसान भरपाईचा मोबदला मिळणेसाठी वारवार मागणी केली जात आहे. मात्र तालुकास्तरावर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम वळतीकरण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसुन येत आहे. तसेच केवायसी आणि विशिष्ट क्रमांकचे कारण दाखवून शेतकर्‍यांना वारंवार तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे परिसरातील शेतकरी बाधवांमध्ये शासकीय यंत्रणेच्या कार्यपध्दती विषयी असंतोष निर्माण झालेला आहे.एकुणच निसर्गाच्या अवकृपेने अन्नदाते शेतकरी बांधव अस्मानी संकटात सापडले आहेत तर अतिशय संवेदनशील बाबीची दखल प्रशासकीय स्तरावर घेतल्या न गेल्याने सुलतानी संकटात ते भरडल्या जात आहेत. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने या गंभीर समस्येची दखल घेऊन सर्व दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम त्यांच्या खात्यात जमा करा अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी मा. जिल्हाधिकारी आणि राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी च्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे केल्या आहेत. अन्यथा शेतकरी बांधवांकडुन तालुका प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...