Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *वरोरा नगरपरिषदेच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*वरोरा नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे मोकसी ले आऊटवासीयांची होणार जलसमाधी*

*वरोरा नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे मोकसी ले आऊटवासीयांची होणार जलसमाधी*

*वरोरा नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे मोकसी ले आऊटवासीयांची होणार जलसमाधी*

 

✍️ राजु गोरे शिरपूर

 

वरोरा:-वरोरा शहराच्या मध्यवर्ती भागात मोकसी ले आऊट असून खोलगट भाग असल्याने या ले आउट मध्ये नगरपालिकेने शहरातल्या अनेक भागातल सांडपाणी आणून सोडलं आहे.वर्षभर नाल्या तुंबून भरलेल्या असते. नाल्या सफाई कर्मचारी सुद्धा तिथे यायला घाबरतात.गेल्या वीस वर्षापासून अनेकदा अर्ज विनंत्या करूनही सदर सांडपाण्याची विल्लेवाट न लावता उलट शहरातलं सांडपाणी तिथे आणून सोडलं परंतु सांडपाणी बाहेर काढण्यासाठी नगरपरिषदेने कोणताही स्थायी उपाय केलेला नाही. पावसाळ्यात थातुरमातुर वेळेवर खोरखार करतात परंतु अवघ्या शंभर फूट अंतरावर असलेल्या मुख्य मोहबाळा रोडपर्यंत नाल्या न करता अर्धवट सोडून दिल्याने घरासभोताल भर उन्हाळ्यात कंमरभर घाण सांडपाणी साचून असते. त्यामुळे डेंगू मलेरिया सारखे आजार या ले आऊट वासियांच्या पाचवीलाच पूजले आहे. डुकरं आणि मोकाट जनावरे तर या अर्धवट नाल्यांच्या गढ्यात पडून मरणे तर नेहमीचेच झाले आहे. वर्षभर घाण दुर्घधीचा सामना करावा लागतो.या वर्षाला तर मोहबाळा रोड लगतच्या देशपांडे, कोटावार, कुरेकार या ले आऊट धारकांनी कोणताही विकास न करता चार पाच फूट भरण भरले आहे त्यामुळे ओव्हर फ्लो पाणी निघण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने पावसाळ्यात मोकसी ले आऊट मधील बऱ्याच घरांना जलसमाधी मिळेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. याला नगरपरिषदेचा नाकर्टेपणा जबाबदार आहे  पावसाळा सुरु होण्यापूर्वी सदर पाणी लेआऊट च्या बाहेर काढण्यासाठी परत आज दि.२८/५/२०२४ ला मा. मुख्याधिकारी नगर परिषद, मा.आमदार वरोरा, मा.उपविभागीय अधिकारी वरोरा यांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी स्थायी उपाय करण्यात यावा तसेच रहिवासीयांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अविकसित ले आउट धारक तथा खाली प्लाटधारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करून पंधरा दिवसात कार्यवाही न केल्यास नगरपरिषदेसमोर सर्व ले आउट रहिवासी उपोषणाला बसणार असल्याचे दिलेल्या निवेदनात कळवण्यात आले आहे. रहिवासी रामचंद्र सालेकर,अरुण ढोके,नविनचंद्र फुलझेले,दौलत मत्ते,धनराज आसेकर,आनंदराव वैद्य,अनंता चौखे,राजु झाडे.आदींनी समस्यांची आपभीती अधिकाऱ्यांपुढे कथन केली.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वरोरातील बातम्या

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना ✍️दिनेश...

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-वरोरा तालुक्यातील...

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा

वरोरा: दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात...