Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / नगरपरिषदे घुग्घुस तर्फे...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

नगरपरिषदे घुग्घुस तर्फे छत्रपति शिवाजी महाराज चौकाजवळ, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण सुमारे 62 आस्थापना हटविण्यात आले.

नगरपरिषदे घुग्घुस तर्फे छत्रपति शिवाजी महाराज चौकाजवळ, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण सुमारे 62 आस्थापना हटविण्यात आले.

आज दिनांक 28/05/2024 रोजी नगरपरिषद घुग्घुस द्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून लावण्यात आलेले सुमारे 62 आस्थापना हटविण्यात आले. पोलीस बंदोबस्ताखाली ही कारवाई करण्यात आली. मागील सहा महिन्यांपासून नगरपरिषद घुग्घुस द्वारे सर्व अतिक्रमण धारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी वारंवार नोटीस देण्यात आली होती व मागील दोन दिवसांपासून जाहीर दवंडी देण्यात आली होती.

नगरपरिषदेच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अर्ध्यापेक्षा अधिक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले परंतु शिल्लक अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नगरपरिषद घुग्घुसच्या यंत्रणे द्वारा काढण्यात आले.

यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होऊन सतत वाहतुकीची कोंडी व अपघाताच्या घटना घडत होत्या. सदर चौकामधून वणी, यवतमाळ, घुग्घुस शहर, नकोडा, ACC कंपनी, लॉयडस कंपनीचे असे हजारो वाहने दररोज जातात. नवीन ग्रामीण रुग्णालय, बसस्थानकाचे लोकार्पण झाल्यानंतर या वाहतुकीमध्ये अधिकच भर पडणार आहे. त्यामुळे सदरचे अतिक्रमण हटविणे अतिशय आवश्यक होते. त्याचप्रमाणे नगरपरिषद घुग्घुस कडून या चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल, सौंदर्गीकरण व सुशोभीकरण ही कामे प्रस्तावित आहेत.

सदर कार्यवाहीच्या दरम्यान नगर परिषद घुग्घुस चे मुख्याधिकारी डॉ. जितेंद्र गादेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर  सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक घुग्घुस सोनटक्के, पोलीस निरीक्षक पडोली चतरकर, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, यांच्यासह नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व पोलीस कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठी घुग्घुस उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

घुग्गुसतील बातम्या

27 वर्षीय ठेकेदाराच्या मुलगा अंकित निलावार जुगार खेळतांना, रामनगर पोलीस निरीक्षक यांनी ताब्यात घेतले.

घुग्घुस- : काल दिनांक 01सप्टेंबर 2024 रोजी मुखबीरकडुन खबर मिळाली की, एन. डी. हॉटेल नागपुर रोड चंद्रपुर येथे 114 क्रमांकाच्या...

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस - वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे...