Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *प्रधानमंत्री ग्राम...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोरपना ते पाकडीगुडुम रस्ता त्वरित दुरुस्त करा अशी मागणी: नारायण हिवरकर यांनी केली*

*प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोरपना ते पाकडीगुडुम रस्ता त्वरित दुरुस्त करा अशी मागणी: नारायण हिवरकर यांनी केली*

*प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोरपना ते पाकडीगुडुम रस्ता त्वरित दुरुस्त करा अशी मागणी: नारायण हिवरकर यांनी केली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कोरपना,पाकडीगुड्डम ते जिवती तालुक्याला अतिदुर्गम भागाला जोडणारा रस्ता त्वरित दुरुस्त करा कोरपना ते जिवती अतिदुर्गम भागातुन तेलंगणा राज्याला कमी अंतरावर जोडणारा रस्ता त्वरित दुरुस्त करून मार्ग मोकळा करा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना यांची मागणीअति दुर्गम भागातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोरपना पाकडीगुड्डम ते जिवती तालुक्याला जोडणार्या रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले असून दरड कोसळुन मोठ मोठे दगड रस्त्यावर पडलेले असुन ह्या रस्त्यावर केव्हाही अपघात होऊन जिवित  हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पावसाळा ऐन तोंडावर येऊन ठेपला आहे जर मोठा पाऊस झाला तर मोठ मोठे खड्डे पडुन,दरड कोसळुन मोठ मोठे दगड रस्त्यावर केव्हाही पडुन रस्ता बंद झाल्याशिवाय रहाणार नाही ऐन शेतीचा हंगाम सुरू झाला आहे व या मार्गावरील आदिवासी,गोरं,गरीब शेतकरी बियाणे,खत,औषधी इतर जिवन आवश्यक साहित्य कोरपना, वणी,बेला,आदिलाबाद व इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करून दोन पैसे वाचल या उद्देशाने याच मार्गाने जातात जर हा मार्ग बंद झाल्यास गोर गरीब शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्या शिवाय राहानार नाही करीता कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अधिकार्यांनी याची दक्षता घ्यावी व त्वरित डागडुजी करून रस्त्यावरी दगड बाजूला सारून रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा अन्यथा होनार्या नुकसानीस कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येनारे अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तसेच श्री सतिश भाऊ उपलंचीवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री अरुण मडावी आदिवासी नेते,श्री कवडु पा जरीले,श्री अमोल आसेकर,श्री शशिकांत आडकिने,सौ वैशाली ताई मडावी सरपंच,ओम पवार उपसरपंच आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

कोरपनातील बातम्या

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...

*कोरपना तालुक्यातील अवैध देशी दारूची सऱ्यास विक्री कुणाच्या आशीर्वादाने?* *अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन करणार मंगेश तिखट यांचा इशारा*

*कोरपना तालुक्यातील अवैध देशी दारूची सऱ्यास विक्री कुणाच्या आशीर्वादाने?* *अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन...